आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्टा करून घेणार विद्यार्थ्यांचा जेईईचा सराव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर अनिवार्य केलेल्या जेईई मेन्स परीक्षेचा सराव महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज टीचर्स असोसिएशन (मेक्टा) विद्यार्थ्यांकडून करून घेणार आहे. त्यासाठी तीन सराव परीक्षाही घेतल्या जाणार असल्याने या परीक्षेविषयी विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती दूर होणार असल्याचे मेक्टाचे अध्यक्ष डॉ. गजानन खराटे यांनी सांगितले.

अभियांत्रिकी प्रवेशासाठी आता एमएचसीईटीऐवजी जेईई ही परीक्षा होणार आहे. तिचे स्वरूप व अभ्यासक्रमाविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आणि भीती आहे. अभ्यासक्रम महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमापेक्षा वेगळा आहे. काठिण्य पातळीही सीईटीपेक्षा अधिक आहे.

आयआयटीला जाणार्‍या राज्यातील विद्यार्थ्यांच्या संख्येत घसरण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही सराव परीक्षा होणार आहे. ती राज्यातील सर्वच विद्यापीठांत होणार असल्याचे खराटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अधिक माहिती www.mecta.in या संकेतस्थळावर व 9552574751 या क्रमांकावर मिळू शकते. असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. डी. टी. इंगोले, सरचिटणीस डॉ. वाय. पी. नेरकर, डॉ. केशव नांदूरकर, प्रा. सी. के. पाटील, डॉ. जयंत पत्तीवार, डॉ. वर्षा पाटील आदी सभासद उपस्थित होते.

नोंदणी सुरू

संकेतस्थळावर 15 जानेवारीपासून नोंदणी सुरू झाली आहे. फोटो, ई-मेल, भ्रमणध्वनी क्रमांक आवश्यक आहेत. एका परीक्षेसाठी दोनशे याप्रमाणे सहाशे रुपयांचा डीडी असोसिएशनच्या नावे जमा करायचा आहे. 15 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान नोंदणी शुल्क भरणार्‍या विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.

पुढील वर्षी 10परीक्षा

मेक्टातर्फे घेण्यात येणारी ही परीक्षा राज्यस्तरीय राहील. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरावरील आपल्या पात्रतेचा अंदाज येईल. बोर्डाच्या परीक्षेनंतर 16, 23 आणि 30 मार्चला या परीक्षा घेण्यात येणार आहेत. यंदा वेळ कमी मिळाल्याने तीनच परीक्षा होणार असल्या तरी पुढील वर्षी मात्र दहा सराव परीक्षा घेण्यात येतील.