आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ईएसआय’मधील सेवेबाबत खासदार हेमंत गोडसे संतप्त, हृदयरुग्णास पाठविले दुस-या रुग्णालयात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर- ‘ईएसआय’रुग्णालय प्रशासनाच्या कारभारात सुधारणा झाल्यामुळे खासदार हेमंत गोडसे यांनी संताप व्यक्त करीत मुंबईतील वैद्यकीय सहायक संचालकांना दूरध्वनी करून नाराजी व्यक्त केली.
तीन महिन्यांपूर्वी खासदारांनी ‘ईएसआय’चा पाहणी दौरा केला होता. कामगार त्यांच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या रुग्णालय प्रशासनाच्या कारभारात सुधारणा व्हावी, अशी मागणी कामगारांनी खासदारांकडे केली होती. त्यानुसार खासदार गोडसे यांनी प्रशासनाच्या कामकाजात सुधारणा करण्यास सांगितले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी त्र्यंबक विद्यामंदिर येथील डॉ. आंबेडकर प्रशिक्षण केंद्र खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कार्यालयाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर अचानक ‘ईएसआय’ ला भेट दिली. या वेळी रुग्ण त्यांच्या नातेवाइकांनी समस्यांचा पाढाच वाचला.
याआढळल्या त्रुटी : पाहणीप्रसंगीरुग्णालयात फक्त दोनच डॉक्टर उपस्थित होते. उर्वरित डॉक्टरांच्या उपस्थितीबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. चव्हाण यांना जाब विचारला असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. रुग्णांना दिले जाणारे अन्नदेखील दर्जेदार नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. रुग्णांची तपासणीही व्यवस्थित होत नसल्याचे उपस्थितांनी सांगतानाच गंभीर रुग्णांना रुग्णवाहिकादेखील उपलब्ध करून दिली जात नसल्याच्या तक्रारी या वेळी करण्यात आल्या.

कामगारांना न्यायमिळवूनदेऊ
ईएसआय’च्यासुमारे ६० हजार लाभार्थी कामगारांच्या आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी मी स्वत: राज्य केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. -हेमंत गोडसे, खासदार
छातीत दुखत असल्याने सुभाष करवल हे शुक्रवारी या रुग्णालयात आले होते. मात्र, ‘तुम्ही अगोदर तज्ज्ञाकंडे जाऊन तपासणी करून या’, असा सल्ला ‘ईएसआय’च्या डॉक्टरांनी दिल्याचे त्यांच्या मुलीने रडतच सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या खासदारांनी तत्काळ ‘टायअप’ असलेल्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी त्यांची रवानगी केली.