आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्सनॅलिटी अँनॅलिसिस टेस्टद्वारे ओळखणार मानसिक आरोग्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सोशल नेटवर्किंगच्या विविध साइट्सच्या माध्यमातून मानसिकतेचा शोध घेण्यासाठी येथील हस्ताक्षरविद्या आणि मानसोपचार क्षेत्रातील दोन युवा अभ्यासकांनी ‘डिजिटल पर्सनॅलिटी अँनॅलिसिस टेस्ट’चा सर्वे हाती घेतला आहे. या सर्वेद्वारे सोशल नेटवर्किंगचा वापर करणार्‍यांचे मानसिक आरोग्य कसे आहे, याची माहिती उपलब्ध होणार आहे.
फेसबुकसारखी सोशल नेटवर्किंग साइट म्हणजे केवळ करमणूक किंवा वेळेचा अपव्यय असा समज आहे. परंतु, आता येत्या काळात अशा सोशल नेटवर्किंगद्वारे त्याचा वापर करणार्‍यांची मानसिकता लक्षात येऊ शकणार आहे. संगणक व त्याच्या विविध साइट्सचा मोठय़ा प्रमाणावर वापर करणार्‍यांना अनेकविध शारीरिक आणि मानसिक व्याधींना सामोरे जावे लागत असून, हा धोका लक्षात घेता, तसेच यामागील मानसिकता व मानसिक आरोग्य ओळखण्यासाठी संगणक अभ्यासक तथा मानसोपचार अभ्यासक तन्मय दीक्षित आणि प्रा. तन्मय जोशी यांनी डिजिटल बिहेविअर टेस्टद्वारे 20 प्रश्न उपस्थित केले आहेत. युरोपियन अकॅडमीक रिसर्च र्जनलमध्ये या टेस्टचा अहवाल प्रसिद्ध केला जाणार असून, प्रत्येक रिसर्चला इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड सिरीयल नंबर (आयएसएसएन) दिला जातो. या डिजिटल पर्सनॅलिटी अँनॅलिसिस टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी सोशल नेटवर्किंगचा वापर करणार्‍या इच्छुकांनी www.dow.tanmaysdikshit.com या लिंकवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संगणकाच्या अतिवापरामुळे उद्भवणारे मानसिक आजार
शारीरिक व्याधींबरोबरच संगणकाच्या अति वापरामुळे मानसिक आजारही होऊ शकतात. संगणकाच्या माध्यमातून लोकांचे व्हच्यरुअल नाते प्रचंड प्रमाणात वाढत जात असल्याने त्यात याचा वापर करणारे लोक गुरफटत जातात. त्यामुळे पाठविलेल्या मेल, मेसेजला किंवा स्टेट्स, पोस्ट, छायाचित्राला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, तर पाठविणारी व्यक्ती अस्वस्थ वा बेचैन होते. अशा गोष्टी सातत्याने झाल्यास रक्तदाब, निद्रानाश, विस्मरण, एकाग्रतेवर परिणाम होणे, चिडचिडेपणा, नैराश्य, नातेसंबंधांतील दुरावा निर्माण होत असल्याचे समोर आले आहे.