आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवंतांचा प्रवेश निश्चित, शनिवारी दुपारी 4 वाजता जाहीर झाली यादी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अकरावी प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी शनिवारी शहरातील विविध महाविद्यालयांकडून जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही या यादीची प्रतीक्षा होती. यामध्ये एचपीटी महाविद्यालयाने यादी जाहीर केलेली नाही.

सर्व महाविद्यालयांमध्ये शनिवारी दुपारी 4 वाजता गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या यादीची प्रतीक्षा विद्यार्थी सकाळी 11 वाजेपासून करत होते. त्यासाठी महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती. महाविद्यालयांकडून शाखानिहाय गुणवत्ता यादी जाहीर करताना सर्व प्रवेश अर्जांची छाननी करून एकूण गुणांकानुसार या याद्या लावण्यात आल्या. काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र यादी लावण्यात आली होती.

काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी यादी लावलेले फलक दुसर्‍या जागी हलवले होते. या सगळ्या धांदलीत ज्यांचे पालक बरोबर आले नव्हते, त्या मुलींना यादी पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. गुणवत्ता यादी जाहीर झाल्याने आता प्रवेशप्रक्रियेला वेग येणार असून, विद्यार्थीवर्ग त्यासाठी आता उत्सुक आहे.