आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meterology Department Work In Sleeping, Raj Thackeray Question In Nashik

वेधशाळा झोपेत काम करते का? मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा नाशकात सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आपल्याकडे सॅटेलाइट यंत्रणा आहे. जर जगात प्रत्येक देशात आपत्तीची सूचना देणारी यंत्रणा असेल तर मग आपल्याकडे का नाही, असा सवाल करत गारपिटीची आगाऊ सूचना वेधशाळा का देऊ शकली नाही, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केला. यंत्रणा झोपेत नसती तर लोकांना सूचना मिळून त्यांचे नुकसान टळले असते, असे सांगत रविवारी नुकसानग्रस्त गावांतील शेतक-यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक दौ-यावर आलेल्या राज यांनी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात विचारले असता, त्यांनी वेधशाळा, हवामान विभागाच्या अकार्यक्षमतेवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, नुकसान भरपाईचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मात्र शेतक-यांचे नुकसानच होणार नाही, हेही पाहिले पाहिजे. आजघडीला आपल्याकडे वेधशाळा आहेत, मात्र त्यांना हवामानाचा अचूक अंदाज वर्तवता येत नाही, हे दुर्दैवी आहे. जर आगाऊ आपत्तीचे अंदाज वर्तवले तर शेतकरी सजग होऊन पिकांचे संरक्षण करू शकतील. जगभरात तशी सूचना देणारी यंत्रणा आहे. मात्र आपल्याकडेच का नाही, असा सवालही त्यांनी केला.
अचूक पंचनामे महत्त्वाचे
नुकसानभरपाईचा पुरेपूर लाभ मिळण्यासाठी अचूक पंचनामे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी बोलून मी अचूक पंचनामे कसे होतील, याची दक्षता यंत्रणेने घ्यावी, अशी सूचना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पंचनामे नीट झाले तर मग लोकांना जाहीर होणारे पॅकेजही पोहोचेल.
नव्या सरकारला पुरेसा वेळ द्यायला हवा
भाजप-शिवसेना सरकारकडून आपत्ती निवारणासाठी विलंब तर होत नाही ना, असा सवाल केला असता, राज यांनी नवीन सरकार असल्यामुळे तूर्तास त्यांना उपाययोजना करण्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. विरोधात असताना त्यांनी जे काही उपाय सुचवले त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करतात हे बघितले पाहिजे. अन्यथा मग काय करावे हे मात्र नक्कीच सांगितले जाईल.