आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळांविरूध्‍द मेटेंनी केलेले विधान अयोग्यच- शरद पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याची घोषणा पाळली नाही म्हणून राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर विश्वास राहिला नाही, असे वक्तव्य आमदार विनायक मेटे यांनी केले होते. त्यावरून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी हे वक्तव्य चुकीचे असून, यापुढे असे होऊ नये, अशा शब्दांत मेटे यांना तंबी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

अन्य आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करणे अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. नारायण राणे समितीचेही काम सुरू आहे. तथापि, मेटे यांनी ज्येष्ठ नेत्याबाबत असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. निवडणुका जवळ आल्या की आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणेही चुकीचे असल्याचा टोलाही पवारांनी लगावला.


आर्थिक निकषावर आरक्षण
मराठा आरक्षणाचा मुद्दा वेगळा आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल. आर्थिक दुर्बलांना आरक्षणाचा मुद्दाही विचाराधीन आहे. मराठा, ब्राह्मण, मुस्लिम असा भेदभाव न करता आरक्षणाचा हा प्रस्ताव आहे, असे पवार म्हणाले.