आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेट्रो प्रकल्पाची तयारी, मात्र विरोध कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- सिडको नाशिक शहराच्या आसपास पुन्हा मेट्रो प्रकल्प उभारणार असून विल्होळीजवळ नवीन वसाहत उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हिंदूराव पुढे म्हणाले की, सिडको तेथील सहावी योजना पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी आयुक्तांशी चर्चा केली जाईल. प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सर्वसामान्याच्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी सिडको मेट्रो प्रकल्प उभारणार आहे. कमी किंमतीत परवडणारे घर देण्याचा सिडकोचा मानस असल्याचे ते म्हणाले.

मुंबई, ठाणे, पुणे येथे मेट्रोसाठी सिडकोने सहकार्य केले असून, ना नफा ना तोटा तत्त्वावर ही योजना राबविली जाईल. नाशिकमधील प्रकल्पासंदर्भात खासदार समीर भुजबळ यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती प्रमोद हिंदूराव यांनी दिली.

शेतकर्‍यांचा विरोध कायम
काही दिवसांपूर्वी हिंदूराव नाशिक दौर्‍यावर आले असताना विल्होळी येथे सिडकोचा प्रकल्प उभारणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शेतकर्‍यांनी तीव्र आंदोलन केले होते. तर विरोध दर्शवण्यासाठी एका शेतकर्‍याने आत्महत्या केली होती. जागा मोजणीसाठी गेलेले तत्कालीन सिडको अधिकारी सुधीर देशमुख यांना काळे फासून खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हिंदूराव यांनी प्रकल्पासंबंधी पुनरुच्चर केला आहे.