आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Metropolitan Planing Committee Election Issue At Nashik

महानगर नियाेजन समिती निवडणूक लवकरच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - लाेकसभा,विधानसभा निवडणूक अाचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेल्या महानगर नियाेजन समिती स्थापण्याच्या हालचाली गतिमान झाल्या अाहेत. त्यादृष्टीने प्रशासकीय स्तरावरून निवडणुकीच्या तारीख निश्चितीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू झाला अाहे. या समितीची निवडणूक लाेकसभा निवडणुकीपूर्वी हाेणे अपेक्षित असले तरी, त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, आता निवडणुकीसाठीचे सर्व अडथळे दूर झाले आहेत.

नाशिक महानगर नियाेजन समितीचे सदस्य निवडणुकीसाठी महानगर क्षेत्राची विभागणी ही ग्रामीण निर्वाचन क्षेत्र, लहान नागरी निर्वाचन क्षेत्र माेठे नागरी निर्वाचन क्षेत्र या तीन विभागात करण्यात अाली अाहे. प्रत्येक क्षेत्रातून निवडण्याच्या एकूण सदस्यांची संख्या संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक निर्वाचन क्षेत्रातील ग्रामीण तसेच नागरी लाेकसंख्येच्या प्रमाणात अाहे.
शासनस्तरावर पाठपुरावा सुरू
^नाशिकमहानगर क्षेत्रात नियाेजन समिती स्थापनेसाठी निवडणुकीची तारीख निश्चित करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू अाहे. आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती. - एकनाथडवले, विभागीयमहसूल अायुक्त

सदस्यांची संख्या
ग्रामीणनिर्वाचन क्षेत्र (जिल्हा परिषद) ११ सदस्य, लहान नागरी क्षेत्र (नगरपरिषद) एक सदस्य माेठे नागरी क्षेत्र (महानगरपालिका) १८ सदस्य याप्रमाणे नाशिक महानगर नियाेजन समितीच्या निवडणुकीसाठी एकूण सदस्य संख्या ३० असणार अाहे. सदस्यांची संख्या लाेकसंख्येच्या प्रमाणात निश्चित करण्यात अाली अाहे. तीन क्षेत्रांची मिळून एकूण लाेकसंख्येनुसार एका सदस्यासाठी ६० हजार ८५३ लाेकसंख्या हे प्रमाण अाहे. त्यानुसार निवडून द्यावयाच्या ३० जागांची विभागणी करण्यात आली अाहे.