आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हाडाच्या घरांचे दर घटवण्याचे संकेत, दाेन लाख रुपयांनी हाेणार स्वस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या अावाक्याबाहेर असल्याने महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडाने)ने बांधलेल्या पाथर्डी येथील प्रकल्पाकडे ग्राहकांनी सपशेल पाठ फिरवल्याने हा प्रकल्प गेल्या दाेन वर्षांपासून धूळखात पडून अााहे. त्यामुळे लवकरच घरांचे भाव कमी करून नव्याने जाहिरात प्रसिद्ध हाेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काेट्यवधी रुपये खर्च करून म्हाडाने पाथर्डी येथे रहिवासी प्रकल्पात तेरा मजली इमारतींचे पाच टाॅवर उभारले. मात्र, येथील घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या अावाक्याबाहेर असल्याने ही घरे घेण्यास काेणी धजावत नसल्याचे दिसून येत अाहे. वास्तविक पाहता सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर परवडणाऱ्या किमतीत मिळावे, यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात अाली अाहे. खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या तुलनेत म्हाडाची घरे स्वस्त मिळणे अपेक्षित असताना पाथर्डी प्रकल्पातील घरे महागडी ठरल्याने नाशिककरांनी या घरांकडे पाठ फिरवली अाहे.
प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर घरांची विक्री करण्यासाठी म्हाडाने सर्वप्रथम गेल्या सप्टेंबर २०१४ला पहिली जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविले हाेते. यावेळी घरांच्या अवास्तव किमती बघून ग्राहकांचा प्रतिसादच मिळाला नाही. त्यानंतर पुन्हा १६ नाेव्हेंबर २०१४ अाणि १५ जानेवारी २०१५ मध्ये पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन ग्राहकांनाघरे घेण्याचे अावाहन करण्यात अाले. या दरम्यान ४० जणांनीच घरांसाठी अर्ज केले. मात्र, अर्ज केलेल्या एकानेही ताबासाठी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने एकाही घराची विक्री हाेऊ शकलेली नाही. त्यामुळे गत दाेन वर्षांपासून पाथर्डी प्रकल्प धूळखात पडून अाहे.

दाेनलाखांपर्यंत किमत घटणार : २०२२पर्यंत सर्वांना स्वतात घरे मिळतील उपलब्ध हाेतील, अशी पंतप्रधानांची घोषणा असली तरी गृहनिर्माण संस्थांच महागडी घरे बांधत अाहेत. त्याचे म्हाडा उत्तम उदाहरण असून, उशिराने जाग अालेले म्हाडा लवकरच भाव कमी करण्याच्या विचारात अाहे. त्यामुळे पाथर्डी प्रकल्पात २-२.५ लाख रुपये भाव कमी हाेणार अाहे.

१६ वनबीएचके, २२,७९,५०० रुपये
प्रत्येकी किंमत
१९२ टूबीएचके, ३३,७,६०० रुपये
प्रकल्पात एकूण २०८ फ्लॅट्स