आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एमअायडीसी’ने मागविले गाळे प्रकल्पासाठी अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘एमअायडीसी’ने अंबड अाैद्याेगिक वसाहतीत बांधण्यात येत असलेल्या गाळे प्रकल्पातील अाैद्याेगिक गाळ्यांच्या वाटपासाठी पात्र उद्याेजकांकडून अर्ज मागविले अाहेत. दरम्यान, या गाळे प्रकल्पाचा वाद न्यायालयात असताना त्याचा निकालही लागलेला नसताना अशाप्रकारे गाळेवाटपाची जाहिरात ‘एमअायडीसी’ने प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली अाहे. ‘एमअायडीसी’ने मात्र या जाहिरातीतून उच्च न्यायालय मुंबई येथे प्रलंबित असलेल्या याचिकेच्या भविष्यात लागणाऱ्या निकालाच्या अधीन राहून प्रस्तावित गाळे घेणाऱ्यांवर बंधनकारक राहील, अशी अट घातल्याने गाळे वाटपाला किती प्रतिसाद मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार अाहे.
अतिरिक्त अंबड अाैद्याेगिक वसाहतीत, ‘एमअायडीसी’ने १४,८५० चाैरस मीटर भूखंडावर अाैद्याेगिक गाळे प्रकल्पाची उभारणी सुरू केली अाहे. तळमजला अधिक दाेन मजले असलेल्या या प्रकल्पात २०७ गाळे असून, त्याच्या वाटपासाठी पात्र उद्याेजकांकडून २७ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०१६ पर्यंत अाॅनलाइन अर्ज मागविण्यात अाले अाहेत. पात्रतेच्या अटी शर्ती, अर्जदाराने भरावयाचे प्रक्रिया शुल्क, इसारा रक्कम, अर्जाचा नमुना, बांधकाम करावयाचे गाळे त्यांची किंमत याची सविस्तर माहिती ‘एमअायडीसी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात अाली अाहे. सन २००९ पासून मागणी करीत असलेल्या उद्याेजकांना या प्रक्रियेत प्रथम स्थान देण्यात यावे कारण, त्यांच्याच मागणीवरून हा गाळे प्रकल्प ‘एमअायडीसी’ने मंजूर केला असल्याचे भाजप उद्याेग अाघाडीचे म्हणणे अाहे. या मागणीसह गाळे प्रकल्पाचे चढे दर कमी व्हावेत या अनुषंगाने त्यांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली अाहे. या याचिकेचा निकाल अालेला नसतानाही ‘एमअायडीसी’ने न्यायालयाच्या भविष्यात येऊ घातलेल्या निर्णयाला अधीन राहून गाळे वाटप प्रक्रिया सुरू केल्याने नव्या वादाला निमंत्रण मिळण्याची शक्यता अाहे.

न्यायालयाच्या निदर्शनास अाणून देणार गाळेवाटपाबाबतचा प्रकार
^न्यायालयाकडून भविष्यात येणाऱ्या निकालाच्या अधीन राहून गाळे वाटप केल्यास अाणि निकाल अामच्या बाजूने लागल्यास वाटप झालेल्या गाळेधारकांकडून हे गाळे परत मिळविण्यावरून नवे प्रश्न निर्माण हाेऊ शकतील. त्यामुळे अाम्ही पुढील तारखेला हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास अाणून देणार अाहाेत. प्रदीप पेशकार, सरचिटणीस,भाजप उद्याेग अाघाडी

अाॅनलाइनसह प्रत्यक्ष जमा करावा लागेल उद्याेजकांना अर्ज
पात्र उद्याेजकांनी गाळा मिळविण्यासाठी अाॅनलाइन अर्ज उपलब्ध असून, ताे डाउनलाेड करावा त्या अर्जात नमूद केलेल्या माहितीप्रमाणे परिपूर्ण अर्ज अाॅनलाइन भरून त्याची प्रिंट काढावी हा प्रिंट केलेला अर्ज अावश्यक ती कागदपत्रे, धनाकर्ष इत्यादींसह नमूद कालावधीत प्रादेशिक अधिकारी, उद्याेगभवन यांच्याकडे सादर करायचा अाहे. अाॅनलाइन अर्ज भरणे अावश्यक असल्याचेही यात म्हटले गेले अाहे.