आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमअायडीसीतील फाइल गहाळ प्रकरण संशयास्पद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  एमअायडीसीतील एक फाइलमधील कागदपत्रे पाच महिन्यांपुर्वी गहाळ हाेतात, पाेलिसात तक्रार दिली जाते, विभागीय चाैकशी हाेवून दाेघांवर कारवाई हाेते अाणि अचानकच ह्या फाइलमधील कागदपत्रे या कार्यालयातील टेबलवर प्रकट हाेतात, असे हे सगळेच प्रकरण संशयास्पद असल्याची चर्चा अाता सुरू झाली अाहे. ज्या उद्याेजकाच्या फाइलचे हे प्रकरण अाहे, त्या उद्याेजकास दीड काेटी रुपयांच्या दंडाची नाेटीस बजावूनही त्याने अद्याप एक रुपया भरला नाही तर दुसरीकडे एमअायडीसीने पाेलिसांकडे लेखी तक्रार करण्याची गरज हाेती, मात्र या प्रकरणी काेणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याने ज्या दाेघांवर कारवाई झाली त्यांना वाचविण्यासाठी तर ही कागदपत्रे काेणी अाणून ठेवली नाही ना? अशी चर्चा अाता उद्याेग वर्तुळात रंगली अाहे. 
 
या प्रकरणी ज्या दाेन अधिकाऱ्यांवर कारवाई झाली खरी, मात्र एमअायडीसीने कागदपत्रे गहाळ झाल्यानंतर केवळ ताेंडी तक्रार पाेलिसात दिली, त्यामुळे याप्रकरणाची सखाेल चाैकशी झालेली नाही. त्याचबराेबर फाइल टेबलवर सापडल्यानंतर पाेलिसांना कळवून तीचा पंचनामाही केला गेला नसल्याने एमअायडीसीचा हा ‘घर का भेदी लंका ढाए’ प्रवृत्तीचा व्यक्ती काेण? याबाबत उत्सुकता बळावली अाहे. पाेलिसात या संदर्भात एफअायअारदाखल हाेणे गरजेचे असून काही ‘उद्याेगीं’ना याच कार्यालयातून कशी कागदपत्रे पुरविली जातात, याच्या सुरस कथाही अाता या निमित्ताने चर्चेत अाल्या अाहेत. एकूणच एमअायडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी कठाेरात कठाेर कारवाई करावी अाणि सत्य समाेर अाणावे अशी अपेक्षा व्यक्त हाेत अाहे. 

फाइल सापडल्यानंतर पंचनामा का नाही 
^याप्रकरणी पाेलिसात एफअायअार दाखल नाही, कारवाई झाली त्या अधिकाऱ्याला अाैरंगाबाद डिएमअायसीमध्ये बदली मिळाली अाहे, त्यांना बढती दिल्यासारखीच स्थिती अाहे. फाइलमधील कागदपत्रे सापडल्यानंतर पाेलिसांनी सांगून पंचनामा का केला नाही? हे प्रकरण संशास्पद असून त्याची सखाेल चाैकशी गरजेची अाहे. -राजेंद्र छाजेड, उद्याेजक 

लेखीपत्राने कळवले 
^एमअायडीसीला फाईल सापडल्यावर तत्काळ पाेलिसांना कळविणे अावश्यक हाेते, मात्र लेखी पत्र पाठवून फाईलमधील कागदपत्रे मिळाल्याचे कळविण्यात अाले. याप्रकरणाचा अाम्ही साेक्षमाेक्ष लावणार. - अविनाश साेनवणे, वरीष्ठ निरीक्षक, सातपूर 
 
बातम्या आणखी आहेत...