आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MIDC,latest News In Divya Marathi,latest News In Divya Marathi

इलेक्ट्रो फॅब कंपनीला आग, अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनी; जीवितहानी नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- अंबड औद्योगिक वसाहतीतील इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन कंपनीला आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि. 15) सकाळी घडली. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीतील कार्यालयाला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागली. धुराचे लोळ पाहताच कंपनीतील काही कर्मचाºयांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन कर्मचाºयांनी परिश्रम घेत ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. आगीचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. अग्निशामक दलाचे अधिकारी अनिल महाजन, ए. के. गवळी, आर. एम. बैरागी, पी. व्ही. तिडके, पी. एम. भोळे, ए. व्ही. जाधव, डी. बी. गायकवाड उपस्थित होते. आग आटोक्यात आणण्यासाठी एस. बी. निकम, एस. के. शिंदे, बी. एन. खोडे आदींनी प्रयत्न केले.
एमआयडीसीच्या अग्निशमन केंद्राची गरज: अंबड एमआयडीसीत अग्निशमन केंद्र उभारावे, यासाठी उद्योजकांकडून सन 2009 पासून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. दीड वर्षापासून सिमेन्स कंपनीसमोरील भूखंड अग्निशमन केंद्रासाठी आरक्षित केला असला तरी या केंद्राच्या मंजुरीचा प्रस्ताव मुख्यालयात पडून आहे. हे केंद्र उभे राहत नाही तोपर्यंत पालिकेने एक बंब औद्योगिक वसाहतीत उभा करावा, अशी मागणीही वर्षभरापासून केली जात आहे, परंतु कर्मचाºयांच्या संख्येअभावी ती पूर्ण होऊ शकत नसल्याचे सांगत पालिकेने अंग झटकले आहे. एमआयडीसी व पालिकेच्या या कारभाराचा फटका उद्योगांना बसत असल्याचे या आगीने उघड झाले आहे.