आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवानाचे श्रीनगरमध्ये अाजारपणामुळे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासलगाव - जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे देशसेवेत असताना वाकी खुर्द (ता. चांदवड) येथील लष्करी जवान शहाजी गाेपाळ गाेरडे यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. श्रीनगर येथून त्यांचा मृतदेह मुंबईमार्गे वाकी येथे अाणण्यात येणार अाहे.

वाकी खुर्द येथील शहाजी गाेपाळ गाेरडे हे २००२ मध्ये अाैरंगाबाद येथे भरती झाले हाेते. बेळगावच्या ट्रेनिंगनंतर पुणे,भटिंडा, अमृतसर व पुन्हा कुपवाडा येथेच कार्यरत हाेते. त्यांचे सहकारी साेमनाथ सानप (रा. बाेकडदरा) यांनी शहाजी यांचे निधन झाल्याची माहिती दिली. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा, मुलगी िसद्धी, मुलगा अाेम, अाई, वडील, दाेन भाऊ व तीन बहिणी असा परिवार अाहे. कुटुंबीयांकडे थाेडीच जमीन असून पगारावरच उदरनिर्वाह हाेता. चांदवडचे तहसीलदार शरद मंडलिक, पाेलिस िनरीक्षक अनंत माेहिते, तलाठी, मंडल अधिकारी यांनी परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले.

एक वर्ष सेवा बाकी
चाैदा वर्षे त्यांची सैन्यात सेवा झाली हाेती. एक वर्षानंतर सेवा संपल्यानंतर पाेलिस सेवेत काम करण्याची इच्छा त्यांनी बाेलून दाखविली हाेती. त्यादृष्टीने त्यांची तयारीही सुरू हाेती. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात साेमवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील.
बातम्या आणखी आहेत...