आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या सेंद्रिय दुधाचे होणार ब्रँडिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दुधाचे दर दिवसेंदविस गगनाला भिडत चालल्याने दूधभेसळीचा गोरखधंदा सुरू झाला आहे. दुधातील भेसळ ओळखण्याची प्रक्रिया अवघड असल्याने, त्यात फसवणुकीची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर शुद्ध दुधाचे गुणधर्म व महत्त्व लक्षात घेऊन नाशिकमधील पांजरापोळ संस्थेने प्रथमच सेंद्रिय पद्धतीने यशस्वीरित्या दुग्धोत्पादन सुरू केले आहे. स्वातंत्र्य दिनापासून सुरू झालेल्या या प्रयोगाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

दूध निर्मितीच्या प्रयोगात संस्थेद्वारे सेंद्रिय पद्धतीने तयार झालेला चारा गायींना घातला जातो. या प्रकल्पातून २५० गायींपासून दविसाकाठी सुमारे १,३०० लिटर दूध मिळते. त्यातील फॅट्स वाढवण्यासाठी कुठल्याही रासायनिक घटकांचा वापर केला जात नाही. तसेच, उत्पादित दुधाची चाचणी जळगाव येथील प्रयोगशाळेत केली जाते. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डकडून (एनएचबी) हे दूध प्रमाणित करण्यात आले असून, त्याची तपासणी व परीक्षण इंडो-सीईआरटी संस्थेकडून होऊन त्यानंतर अहवाल दिला जातो. फक्त चाळीस रुपये लिटरने मिळणारे हे दूध लवकरच ब्रँडेड स्वरूपात फूडग्रेड्सच्या अर्धालिटर पाउचमध्ये "एसएनपीपीपी गौ अमृत' या ब्रँडने वितरित केले जाणार असल्याची माहिती पांजरपोळचे व्यवस्थापक तुषार पालेजा यांनी दिली.
आरोग्याला पोषक
दुधामधील फॅट्स वाढविण्यासाठी रासायनिक घटकांचा सर्रास वापर केला जातो. तसेच भेसळीचे प्रमाणही वाढले आहे. परंतु, सेंद्रिय पद्धतीने पशुचारा व शेतजमीन तयार करून गायींना चारा िदला जात असल्याने तयार होणारे दूध पूर्णपणे शुद्ध व सत्त्वयुक्त असते. प्रयोगशाळा तसेच संस्थांकडून तपासणी केली जात असल्याने सेंद्रिय दूध आरोग्याला पोषक आहे.
तुषार पालेजा, व्यवस्थापक
काय आहे सेंद्रिय दूध?
पंचवटी पांजरपोळ संस्थेद्वारे सेंद्रिय खतांचा वापर करून तयार केलेला पशुचारा व अन्य घटक गायींना दिला जातो. त्यात रासायनिक घटकांचा अंतर्भाव होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाते. संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने केली जात असल्याने सेंद्रिय दुधाचे उत्पादन शक्य झाल्याचा दावा संस्थेने केला आहे. या सेंद्रिय दूध निर्मितीची माहिती व केमिकल रेसिड्यू रिपोर्ट संस्थेने www.snpp.in या संकेस्थळावर उपलब्ध केली आहे. या दुधाची साठवणूक क्षमता पाच दिवसांपर्यंतची आहे.