आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी घटल्याने दूध प्रतिलटर ४० रुपयांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सण-उत्सवाच्या काळात साठी पार करणाऱ्या दुधाचे दर दिवाळीनंतर चक्क २० रुपयांनी घसरले अाहेत. सुट्यांचा कालावधी तसेच मिठाई व्रिकेत्यांकडून दुधाची मागणी घटल्याने दरात घसरण झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शनिवारी दूधबाजारात प्रतिलिटर दूध ४० रुपये हाेते.
जुन्या नाशकातील दूधबाजारात शनिवारी दुधाचा भाव प्रतिलिटर ४० रुपये हाेता. दिवाळीनिमित्त शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांना सलग सुट्या आहेत. ही संधी साधत बहुतांश नागरिक बाहेरगावी गेले आहेत. तसेच, दिवाळी पार पडल्यानंतर मिठाई व्रिकेत्यांकडूनही दुधाची मागणी घटली आहे. या परिस्थितीमुळे दुधाच्या दरात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. एरवी दूधबाजारात ६० ते ६५ रुपये प्रतिलिटर दराने दुधाची व्रिकी करण्यात येत हाेती. कोजागरी पाैर्णिमेला तर दुधाचा दर ७० ते ७५ रुपयांपर्यंत पोहोचला हाेता. दरम्यान, अचानक कमी झालेल्या दरामुळे दूधबाजारात दूध खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.

विक्री वाढीसाठी दर घटवले
^दिवाळी नंतर नागरिक बाहेरगावी गेले अाहेत. त्यामुळे दुधाची मागणी घटली असून, विक्रीवाढीसाठी दर कमी करण्यात अाले अाहेत. सलीमकाेकणी, दूधव्यावसायिक