आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरातील अभिषेकासाठीचे दूध गरजूंनाच दिल्यास ठरेल फायद्याचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंचवटीतील कपालेश्वर मंदिरात अभिषेक करताना काहीअंशी दुधाचा वापर करावा; उर्वरित दुधाचा वापर गरजू वा कुपोषित बालकांसाठीच करावा, अशी आग्रही मागणी अनेक भाविकांकडून केली जात आहे. ‘दिव्य मराठी’ने केलेल्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत वाचकांकडून सूचनांचा अक्षरश: पाऊस पडत आहे.

मंदिरात होणा-या दुग्धाभिषेकामुळे शेकडो लिटर दूध वाया जाते. तसेच, पिंडीची झीज होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे दुग्धाभिषेकासाठी आणलेल्या दुधापैकी काही प्रमाणात दुधाचा वापर अभिषेकाकरिता केल्यास व उर्वरित दूध बाजूला काढून ठेवल्यास ते दूध गोरगरीब वा गरजूंना वितरित करता येईल.

‘दैनिक भास्कर’ने देशभरातील ज्योतिर्लिंग, तसेच मोठ्या मंदिरांत हा सामाजिक बांधिलकी
जोपासणारा उपक्रम हाती घेण्यासाठी आवाहन केले आहे.

‘दिव्य मराठी’च्या माध्यमातूनही नाशिक शहर व जिल्ह्यातील भाविकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यास समाजातील सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

कळवा तुमचेही मत
‘दिव्य मराठी’ने सुचविलेल्या उपक्रमाबाबत नागरिकांना काही सूचना, मते मांडायची असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात ‘दिव्य मराठी’ कार्यालय, प्लॉट नं. 1, शीतल अ‍ॅव्हेन्यू, चांडक सर्कल या पत्त्यावर किंवा 9975547616 किंवा 8275053123 या मोबाइल क्रमांकावर एसएमएस किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवावा. संदेशासोबत प्रतिक्रिया देणा-याने आपले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रही टाकावे.

गोमातेसाठीही प्रयत्न व्हायला हवेत
अभिषेकावर गाईचे दूध फारसे न वापरता ते गोरगरिबांसाठी वापरावे हा उद्देश अतिशय वाखाणण्याजोगा आहे. परंतु, यापुढील काळात दूध देणा-या गोमातेलाही वाचविण्याचा उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे. गोहत्या बंदीसाठीदेखील सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा.
गोकुळ अनारथे, व्यावसायिक