आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईदमुळे दुधाचे दर प्रतिलिटर ९० रुपयांवर, नाशकात प्रथमच दुधाच्या दराचा उच्चांक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मंगळवारी चंद्र दर्शन घडल्यास बुधवारी रमजान ईद साजरी होणार म्हणून दूधबाजार परिसरासह शहरातील दूध विक्री केंद्रांवर मंगळवारी सायंकाळी खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने दुधाचे दर उंचावले. एरवी ५० ते ५५ रुपये प्रति लिटर दराने विक्री होणारे दूध मंगळवारी ८५ ते ९० रुपयांपर्यंत पोहोचले होते. दरम्यान, बुधवारी पुन्हा दुधाचे दर ८० ते ८५ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता दूध व्यावसायिकांकडून वर्तवण्यात आली अाहे.
रमजान पर्वाचा २९व्या रोजेच्या दिवशीच चंद्रदर्शन घडण्याची शक्यता वर्तवली जात होती. यामुळे शहरातील सुकामेव्यांचे दुकानांसह शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या दुधालाही मोठी मागणी होती. रात्री उशिरापर्यंत शहरातील शाही मशीद येथील सिरत कमिटीत जिल्ह्यातील कोणीही माहिती (शहादत) दिली नसल्याने सिरत कमिटीच्या वतीने गुरुवारी (दि. ७) ईद साजरी होणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, या अाधीच दुधासाठी नागरिकांनी गर्दी केल्याने दुधाचे दर ८५ ते ९० रुपयांपर्यंत पोहोचले होते. कोजागरी पौर्णिमा असो की ईद, या सणांच्या पार्श्वभूमीवर दूध व्यावसायिक दुधाचे दर वाढवत असल्याचे दिसून येते. मात्र, रमजान ईद गुरुवारी असताना ईद बुधवारी असल्याचे समजून ग्राहकांनी ९० रुपये देऊन खरेदी केलेल्या दुधामुळे ग्राहकांना भुर्दंड बसला अाहे.

गोरगरीब जाणार कुठे...
^कोणताही सण आला की दुधाच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ केली जाते. रमजानमध्ये तर दूधबाजारातील व्यापारी ८५ ते ९० रुपये लिटरने दूध विक्री करतात. मग गोरगरीबांनी ईद साजरी करायचा की नाही. -हनिफ कुरेशी, ग्राहक

फक्त दूधबाजारातच वाढ
दरम्यान,मंगळवारी सिडको, सातपूर, गंगापूररोड, नाशिकरोड परिसरात दुधाचे दर ६० रुपयांपर्यंत होते. मात्र, दूधबाजारात मंगळवारी सायंकाळपासूनच ८५ रुपये लिटरचे फलक लावण्यात आलेले होते. तर, सायंकाळी नमाजानंतर दुधाचे दर ९० रुपयांपर्यंत पोहोचले.
बातम्या आणखी आहेत...