आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध लिटरमागे चार रुपयांनी हाेणार स्वस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यातदुधाची पावडर निर्मिती बंद झाल्याने मागणीच्या तुलनेत दूध शिल्लक राहात अाहे. याबराेबरच इंधनाचे दर घटल्याने लाखो लिटर दूध शिल्लक राहात असल्याने येत्या दोन-तीन दिवसांत दुधाच्या दरात लिटरमागे तीन-चार रुपयांनी घट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सध्या ४० रुपये लिटरने विक्री होणारे गायीचे दूध ३६ रुपये लिटरने ग्राहकांना मिळण्याची शक्यता अाहे. दर घटल्यास सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार असून, दुधाची मागणीही वाढण्यास मदत होईल.
दुधाची पावडर तयार करण्यात येत असल्यामुळे दुधाची टंचाई जाणवत हाेती. याची दखल घेऊन केंद्र सरकारने दूध पावडरच्या निर्यातीवर बंधने घातली अाहेत. दूध पावडरच्या निर्यातीवर टक्के कर अाकारण्यात अाल्याने दुधाची पावडर तयार करणाऱ्या उद्योगावर संकट अाले असून, बाजारात मुबलक दूध उपलब्ध होऊ लागले. मात्र, ग्रामीण भागात दलाल शेतकऱ्यांकडून यापूर्वीच कमी दरात दूध खरेदी करत होते. त्यातच इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात घटल्याने दूध वाहतुकीचा खर्चही कमी झाला आहे. मात्र, सामान्य ग्राहकांकडून पूर्वीचाच दर घेण्यात येत होता. त्यामुळे दूध ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
सध्या पुणे आणि नगर जिल्ह्यातील काही खासगी दूध डेअऱ्यांनी दुधाचे दर चार रुपयांनी घटवले असून, नाशिक जिल्ह्यातही दुधाचे दर कमी करण्याचा निर्णय जिल्हा दूध संघ घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.