मालेगाव - आरजीमोन भेसळयुक्त शेंगदाणा तेलाची विक्री केल्याप्रकरणी मालेगाव येथील व्यापा-यास न्यायालयाने नऊ वर्षे तुरुंगवास व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. सुगनचंद रतनलाल जैन असे शिक्षा झालेल्या व्यापा-याचे नाव आहे. सत्र न्यायाधीश एस. आर. भद्गले यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. मालेगावमध्ये नऊ वर्षापूर्वी भेसळयुक्त तेल खाण्यात आल्याने अनेक नागरिकांना आजार जडले होते.
भेसळीचे तेल खाल्ल्याने विकार वाढल्याचे वैद्यकीय अधिका-यांच्या लक्षात आले. त्यानंतर याप्रकरणी चौकशी झाली असता जैन यांच्या मिलवरून तेल खरेदी झाल्याचे आढळले. त्यामुळे अन्न निरीक्षकांसह शहर पोलिसांनी जैन यांच्या मिलवर छापा टाकून खाद्यतेलाचा साठा जप्त केला होता. यातील तेल नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असता त्यात आरजीमोन या केमिकलची भेसळ असल्याचे निष्पन्न झाले होते.