आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावात एमआयएम, शिवसेना समर्थकांची सत्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - मालेगाव मनपा उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहिल्याने कुरघोडीच्या राजकारणात शिवसेना व एमआयएम समर्थकांनी सत्ता मिळवली.
बुधवारी निवडणुकीत महापौरपदी तिसरा महाजचे हाजी इब्राहिम विजयी झाले. शिवसेनेने इब्राहिम यांच्या बाजूने मतदान केले. पण उपमहापौरपदाच्या निवडीत शिवसेना तटस्थ राहिल्याने शेख युनूस इसा विजयी झाले. इसा यांचा मुलगा मलिक इसा यांनी एमआयएमकडून विधानसभा निवडणूक लढवली होती.

शिवसेनाच नव्हे मनसेही
शिवसेनाच नव्हे, तर मनसेचे २ नगरसेवक उपमहापौरांच्या आघाडीत आहेत. त्यांनी मतदानात भाग घेतला. त्यामुळे एमआयएमने मनसेचे सूतही दिसून आले.