आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister Chhagan Bhujbal, Latest News In Divya Marathi

ओबीसींच्या हितासाठीच शिवसेनेला रामराम पालकमंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या व प्रश्न सोडवण्यासाठीच आपण शिवसेनेला सोडचिठ्ठी देत सुमारे चारशे पोटजातींना अनेक सवलती मिळवून दिल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
महाकवी कालिदास कलामंदिरात महाराष्ट्र राज्य बाराबलुतेदार महासंघाच्या वतीने आयोजित पहिल्या विभागीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी भुजबळ म्हणाले, ‘तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या माणसाला बोलावले आहे. आचारसंहिता लागू झालेली असल्यामुळे मला कोणतेही आश्वासन देता येणार नाही. ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळण्यासाठी मी लढतो आहे. राजकारणात माझी ओळख ओबीसी नेता म्हणूनच आहे. काहीजण म्हणतात, भुजबळांनी ओबीसींसाठी काहीच केले नाही, तेव्हा वाईट वाटते. शेतकर्‍यांपेक्षाही मोठे नुकसान बाराबलुतेदारांचे झाले आहे.’
बाराबलुतेदार समाजातील कोणालाही लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेचीही उमेदवारी मिळत नसल्याचे महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी सांगितले. समाजाच्या मागण्या व समस्यांबाबत संघटित होऊन पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सचिव अरुण नेवासकर यांनी केले. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, चंद्रकांत गवळी, अशोक सोनवणे, दिलीप तुपे उपस्थित होते.