आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'भ्रष्ट नेत्यांवर कारवाई हाेणारच, अजित पवार, तटकरेंना अभय नाही\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- माजी मंत्री छगन भुजबळांविराेधात करण्यात अालेल्या तक्रारीसंदर्भात २० जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे अादेश न्यायालयाने एसीबीला दिल्यानंतर त्यांच्याविराेधातील कारवाईला वेग प्राप्त झाला आहे. म्हणून राज्यातील भाजप सरकारकडून भुजबळांनाच टार्गेट केले जातेय, अजित पवार आणि सुनील तटकरेंना अभय दिले जातेय, असे अजिबातच नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर कारवाई होणारच, असे स्पष्ट करत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी नाशिक दाैऱ्यात भुजबळ, तटकरे आणि अजितदादांवर चांगलेच ताेंडसुख घेतले.

आमदार छगन भुजबळांवरील कारवाई आकसापोटी केली जात अाहे का? अशी विचारणा वारंवार माध्यमांकडून होतेय. भुजबळ तर म्हणताहेत, हे सारं चुकीचं आहे. मालमत्ता वडिलोपार्जित असून आताच्या दरांचा विचार करून तिच्या किमतीचे आकडे फुगवून बदानामी केली जात असल्याचा त्यांचा दावा अाहे. जर खरंच हे सारं चुकीचं असेल, तर होऊ द्या की चौकशी. त्यात दोष नसल्यास कारवाई होणार नाही. त्यामुळे तुम्ही त्याबाबत चिंता कशाला करता, असा खोचक प्रश्नही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे भाजप कार्यालयात बोलताना उपस्थित केला. अजित पवार आणि सुनील तटकरेंना अभय दिले जात आहे. त्यांच्यावरील कारवाईचे काय? असे मला विचारले जातेय. परंतु ही कारवाई सरकार अजिबातच करत नाही. न्यायालयात दाखल करण्यात अालेल्या जनहित याचिका अाणि त्यातील तक्रारींवरून न्यायालयाच्या आदेशाने सरकारी यंत्रणा केवळ अहवाल, पुरावे, माहिती न्यायालयासमाेर सादर करत आहे.

अजित पवार, तटकरेंवर कारवाई
अजित पवार आणि तटकरेंच्या चाैकशीसंदर्भात असलेली माहिती व पुरावे अैारंगाबादच्या चितळे समितीला आणि सरकारला देण्यात अाल्यानंतर ते न्यायालयात सादर केले जातील.या सर्व तांत्रिक बाबी असल्याने चौकशीसाठी वेळ लागणार अाहे. वेळ लागत आहे याचा अर्थ कारवाई टाळली जात आहे असा होत नाही. या दाेघांवरही कारवाई होणारच असल्याचे स्पष्ट संकेत महाजन यांनी दिले.