आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपच्या प्रतिमासुधारासाठी पालकमंत्र्यांचा जनता दरबार, दर महिन्याला जाणून घेणार तक्रारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेतल्यानंतरही नानाविध अडचणी अाणि समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या नाशिककरांमध्ये भाजपची प्रतिमा मलीन हाेत असल्याचे पाहून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अखेरीस जनता दरबाराचे अस्त्र काढले अाहे. दिवाळीनंतर साधारणपणे २५-२६ अाॅक्टाेबरच्या अासपास या जनता दरबाराच्या माध्यमातून सर्व खात्यांशी संबंधित लाेकांचे प्रश्न जागेवरच निकाली काढण्याचे नियाेजन करण्यात अाले अाहे. 
 
कधीकाळी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचा, तर त्यानंतर राज ठाकरे यांचा गड मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर ‘शत-प्रतिशत भाजप’चे चित्र निर्माण झाले. भाजपचे तीन अामदार शहरातून निवडून गेले. त्यानंतर महापालिका निवडणुकीत भाजपविराेधात विराेधकांनी राळ उठवली असतानाही ६६ नगरसेवक निवडून देत नाशिककरांनी महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या पक्षाला एकहाती सत्ता दिली. अर्थात, त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत ‘दत्तक नाशिक’ची सादही उपयुक्त ठरली; मात्र त्यानंतर सात महिन्यांच्या कालावधीत भाजपला चमकदार कामगिरी करता अालेली नाही. शहरापुढील एकही महत्वाचा प्रश्न सुटलेला नाही. नवीन प्रकल्पांची तर वानवाच अाहे. त्यातच महापाैर, सभागृहनेते अन्य पदाधिकारी शह-काटशहाच्या राजकारणात अडकले अाहेत. महासभेतील वाद नित्याचे झाले असून, पक्षाची पुरती हाेत अाहे. ही बाब अाेळखून मध्यंतरी पालकमंत्र्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या हाेत्या. कारभार सुधारल्यास कठाेर निर्णयाचे संकेतही त्यांनी दिले हाेते; मात्र त्यानंतरही ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशी स्थिती अाहे. 
 
लाेकसभा निवडणूक दीड वर्षावर अाली असून या पार्श्वभुमीवर भाजपची प्रतिमा सुधारण्याची गरज निर्माण झाली अाहे. त्यामुळे अाता पालकमंत्री महाजन जनता दरबाराच्या निर्णयाप्रत पाेहाेचले अाहेत. यातून नाशिककर भाजपमधील दरी कमी करता येईल, अशी त्यांना अपेक्षा अाहे. २५ किंवा २६ अाॅक्टाेबरला जनता दरबार घेण्याचे नियाेजन असून त्यानंतर दर महिन्याला त्या माध्यमातून लाेकांपर्यंत पाेहचण्याचे उद्दिष्ट ठेवले अाहे. 
 
काय असेल जनता दरबारात?
पालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पाेलिस, पाटबंधारे खाते, सहकार, कृषी अशा खात्यांशी संबंधित प्रश्न तातडीने कसे साेडवता येतील, असा प्रयत्न जनता दरबारात राहील. लाेकशाही दिनासारखे उपक्रम हाेतात. मात्र, बऱ्याचवेळा सरकारी बाबूंकडून दाद मिळत नाही असे दिवस साेपस्कार म्हणूनच राहतात. या पार्श्वभूमीवर जनता दरबार परिणामकारक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार अाहेत. 
 
जागेवरच प्रश्न साेडविण्याचा उद्देश 
लाेकांच्या विविध सरकारी कार्यालयांशी संबंधित तक्रारी वा प्रश्न असतात. बऱ्याचवेळा त्यांना दाद मिळत नाही. जनता दरबारातून जागेवरच प्रश्न साेडवता यावा हा प्रयत्न अाहे. दिवाळीनंतर जनता दरबार घेतला जाईल. 
- गिरीश महाजन, पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री 
बातम्या आणखी आहेत...