आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister Of State For Cooperation Dada Bhuse In Nashik

बचतगटांना कायमस्वरूपी स्टॉल देण्याचा प्रयत्न :दादा भुसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महिला बचतगटांतील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर असे बचतगटांचे प्रदर्शन आणि कायमस्वरूपी स्टॉल्स उपलब्ध होणे गरजेचे असून, मी त्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले. डोंगरे वसतिगृह मैदानावर राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत सातदिवसीय विभागीय आणि जिल्हास्तरीय महिला बचतगटांच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद‌्घाटन शुक्रवारी दादा भुसे यांच्या हस्ते झाले.
या वेळी बोलताना भुसे यांनी महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठीच शासनाने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. बचतगटांमार्फत तयार करण्यात आलेल्या वस्तूंना चांगली किंमत आणि विक्रीची जागा मिळावी. त्यांना प्रोत्साहन मिळावे हीच शासनाची भूमिका आहे. त्याचा महिलांनी आपल्या उन्नतीसाठी फायदा करून घ्यावा. ‘चूल आणि मूल’ या पारंपरिक संकल्पनेतून बाहेर येत आपले कर्तृत्व सिद्ध करावे. दरम्यान, अनेक बचतगट व्यवसायासाठी कर्जे घेतात. परंतु ते व्यवसाय सुरूच करत नाहीत. त्यामुळे बचतगटांचा मूळ उद्देश बाजूलाच राहतो. असे करता ज्या उद्देशाने कर्ज घेतले आहे तो व्यवसाय सुरू करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांनी ग्रामविकास यंत्रणेने माल उत्पादित करण्यासह महिलांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
उद‌्घाटनप्रसंगी राज्यमंत्री दादा भुसे, तर प्रदर्शनात वस्तंूची पाहणी करताना महिला.
राज्यमंत्र्यांच्या अधिकाराबाबत तरतूद आहे. ते सर्वत्रच उपलब्ध आहेत. त्यावर गदा आणली जाते किंवा नाही हे तुम्हीच तपासा आणि तुमचे मत मांडा, अशी सावध प्रतिक्रिया देत सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी राज्यमंत्रिपदाच्या अधिकारांवरून उफाळलेल्या वादावर भाष्य करणे टाळले.