आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या बांडगुळांना तुरुंगामध्ये टाकणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- फुले, शाहू आंबेडकरांच्या नावाने वर्षानुवर्षे राज्याची सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी मागासवर्गीयांसाठी असलेल्या महामंडळांची सर्रास लूट केली. अण्णाभाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहारांची चौकशी सुरू असून आजवर ३८५ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आली असून, गैरव्यवहारांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याने मागास समाजाच्या निधीची लूट करणाऱ्या राष्ट्रवादीच्या बांडगुळांना तुरुंगात टाकण्याचा इशारा राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिला.
महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित राजर्षी शाहू महाराज सहकारी पतसंस्थेचा उद््घाटन समारंभ तसेच मातंग हक्क परिषद मेळाव्याप्रसंगी राज्यमंत्री कांबळे बोलत होते. या प्रसंगी भाजपचे नेते सुरेश पाटील, आमदार सीमा हिरे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, जि. प. अध्यक्षा विजयश्री चुंभळे, लक्ष्मण सावजी, भास्कर कोठावदे, अजय ब्रह्मेचा, चंदुलाल शहा, एनडीसीसी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, संस्थेचे अध्यक्ष वाय. आर. शिरसाठ, उपाध्यक्ष बाळासाहेब साठे आदी उपस्थित होते. साठे महामंडळातील गैरव्यवहारांची चौकशी सुरू असून, येत्या १० दिवसांत अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर दोषींवर कारवाईचा इशाराही कांबळे यांनी या वेळी दिला.
त्या पतसंस्थांवर कारवाई : राज्यात लाखो सहकारी संस्था १५ हजार पतसंस्था आहेत. त्यातील ४०० संस्था बंद आहेत. पतसंस्थांविषयी अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे संचालकांनी चांगले कामकाज करून प्रामाणिकपणे कामकाज करावे. आर्थिक व्यवहार सुरक्षित करून कर्ज वसुलीकडे लक्ष द्यावे. ज्या पतसंस्था चांगले काम करतील त्यांचा गौरव करण्यात येईल. तर ज्या संस्था चुकीचे कामे करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा सहकार, पणन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी बोलताना दिला.
साठे महामंडळातील कर्ज ऑगस्टपासून
अण्णाभाऊ साठे महामंडळात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असून दोषींवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर अण्णाभाऊ साठे जयंतीदिनानिमित्त सरकारतर्फे नवीन योजना कार्यान्वित केल्या जाणार असून लाभार्थींना कर्ज वाटप सुरु केले जाणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.
प्रकल्प सुरू करा, पैसा त्यासाठी आम्ही देतो
मागासवर्गीय समाजातील युवकांनी स्वत: व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन करत अशा प्रकारे प्रकल्प सुरू केल्यास त्यांना दहा कोटींपर्यंत निधी मिळवून देण्याची ग्वाहीही यांनी येळी देण्यात आले. विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्चही सामाजिक न्याय विभाग करेल, असेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...