आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळ पार्टी प्रकरणात मंत्र्यांची भूमिका संशयास्पद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अाेझर विमानतळावर रंगलेल्या अधिकारी, ठेकेदारांच्या साग्रसंगीत पार्टीच्या चाैकशीची शासनाकडे मागणी करणाऱ्या सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ खासदार हरिशचंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीतच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात अधिकाऱ्यांना जाहीरपणे क्लीन चिट दिल्याने तक्रारदार चव्हाण यांच्यावर अविश्वासच दाखविला. या प्रकाराने पक्षांतर्गत वाद उफाळण्याची चिन्हे आहेत. चव्हाण यांनी पुराव्यानिशी तक्रार करूनही अधिकारी माेकळे सुटल्याने बांधकाम मंत्र्यांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने चार महिन्यांपूर्वी अाेझर विमानतळावर पार्टी झाली हाेती. पार्टीच्या दुसऱ्या दिवशी दिंडाेरी तालुक्यातील सरपंच, ग्रामस्थांनी खासदार चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्या हाेत्या. त्याची दखल घेत खुद्द चव्हाण यांनीही माध्यमांच्या प्रतिनिधींसाेबत विमानतळावर पाहणी केली. याविषयी चव्हाण यांनी मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री, पालकमंत्र्यांसाेबत केंद्राच्या संरक्षण मंत्रालय अाणि विमानतळ प्राधिकरणाकडेही तक्रार केली हाेती. या प्रकरणी दिंडाेरी पाेलिसांत संयाेजकांसह काही अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते.

अर्थपूर्ण घडामोडी?
पत्रपरिषदेतबांधकाममंत्री पाटील यांनी विमानतळ पार्टीच्या चाैकशीत अधिकाऱ्यांचा सहभाग अाढळून अाला नसल्याचे सांगत त्यांना क्लीन चिट िदली. यामुळे खासदार चव्हाण यांच्या तक्रारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत अाहे. पाटील यांच्या दाेषी अधिकाऱ्यांना वाचविण्यामागे अर्थपूर्ण घडामाेडी घडल्याचीही चर्चा आहे.
बातम्या आणखी आहेत...