आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकाेत पाेलिस कर्मचाऱ्याला धमकी देत केली धक्काबुक्की

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडकाे- शहर परिसरात वाहनधारकांना हेल्मेटसक्तीसाठी पाेलिस ठिकठिकाणी तपासणी करीत असताना तीन युवकांनी नाकाबंदीवरील पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालीत धक्काबुक्की केल्याची घटना सिडकोत घडली. एवढेच नव्हे तर या तिघांची मजल पाेलिस कर्मचाऱ्याला ‘तुझी वर्दी उतरवताे, तुला खाेट्या गुन्ह्यातच अडकवताे’ अशी धमकी देण्यापर्यंत गेल्याने संताप व्यक्त करण्यात येत अाहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात अाली अाहे.
 
चार दिवसांपूर्वीच वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक सुरेश भाले हेल्मेटविराेधी कारवाई करीत असताना दुचाकीस्वाराने थेट त्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा प्रकार घडला हाेता. सातपूर येथे एका उपनिरीक्षकासह दाेघा कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याची घटना ताजी असताना सिडकाेतही तसाच प्रकार घडला. यामध्ये संशयित सचिन शिवाजी चंद्रमोरे, सुनील पोपट भरीत सचिन शिवाजी चंद्रमोरे या तिघांना अटक करण्यात अाली अाहे. 
 
अंबडचे कर्मचारी अनिरुद्ध येवले यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी (दि. १२) दुपारी संशयित दुचाकीवरून (एमएच ४१ के ८१६६) विनाहेल्मेट प्रवास करीत असताना त्यांना थांबवित त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात अाली. त्यानंतर तिघेही निघून गेले. मात्र, काही वेळाने तिघांनी नाकेबंदीच्या ठिकाणी येऊन महिला कर्मचाऱ्याशी दंडात्मक कारवाईवरून हुज्जत घातली. येवले यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी येवले यांच्या गळ्याला पकडून धक्काबुक्की तसेच दमदाटीही केली. 
 
पाेलिसालाच वर्दी उतरविण्याची धमकी : काही महिन्यांपासून शहरात पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांचे प्रकार वाढत असतानाच संशयितांविरुद्ध कुठलीही कठाेर कारवाई हाेत नसल्याने कर्मर्चाऱ्यांचे मनाेधैर्य खचत अाहे. यंत्रणेचे प्रमुख पाेलिस अायुक्त उपअायुक्तांकडूनही संशयितांविरुद्ध याेग्य कारवाई केली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...