आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Miserable End Of Aunt And His Niece Under Garbage

कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली मावशी व भाचीचा करुण अंत, दुष्काळाने भाकरी हिसकवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - दुष्काळामुळे शेतातही मजुरी मिळत नसल्याने सिन्नरमधील महिला विल्होळी नाका येथील कचरा डेपोवरील वस्तू गोळा करून त्या भंगार बाजारात विकून गुजराण करत होती. बुधवारी ती आपली बहीण आठ वर्षांच्या भाचीसह कचरा डेपोवर गेली. परंतु, उंच ढिगारा कोसळल्याने भाचीसह ती त्याखाली गाडली गेली. बाजूलाच असलेल्या या महिलेच्या बहिणीने आरडाओरडा करत तेथील अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. नंतर पोलिसांकडेही तक्रार केली. परंतु, गुरुवारी दुपारी १२ वाजता शोधमोहीम सुरू झाली.
घटनेच्या तब्बल २१ तासांनंतर प्रशासन जागे झाले २८ व्या तासांनंतर हजारो टन कचरा अंगावर पडलेल्या मावशी भाचीला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच श्वास कोंडून आगीच्या चटक्यांनी त्यांचा करुण अंत झाला. नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कचरा डेपोने दोन निरपराध जिवांचा बळी घेतला. या घटनेनंतर कचरा गोळा करून गुजराण करणाऱ्या गरीब महिला कामगारांवर दु:खाची छाया पसरली होती.
बुधवारी दुपारी वाजेच्या सुमारास पूनम बाळू माळी (२८) या आपली बहीण भाची कोमल माळी (८, दोघेही रा. कवठेकरवाडी, पांडवलेणी) सह खत प्रकल्पावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील प्लास्टिक, नारळाच्या कवट्या इतर वस्तू गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. हा ढिगारा सुमारे ५० ते ८० फूट उंच होता. तो अचानक कोसळल्याने काही कळायच्या आतच दोघीही ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या. ही सर्व घटना कोमलची आई ताईबाई माळी यांनी डोळ्यादेखत पाहिली.
घाबरलेल्या अवस्थेत तिने खत प्रकल्पावरील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर इंदिरानगर पोलिसांत जाऊन सांगितले. मात्र, खत प्रकल्पावरील अधिकारी आणि पोलिसांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. गुरुवारी सकाळी येथील काही युवक ताईबाई माळी यांनी पाथर्डी फाटा येथील शिवसेनेचे पदाधिकारी सुदाम डेमसे यांचे घर गाठले. त्यांना सर्व हकिकत सांगितल्यावर त्यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. येथील अधिकाऱ्यांना विनंती केली. मात्र, तरीही नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांना डेमसे यांनी शिवसेना स्टाइलने धारेवर धरताच सर्व यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनाही कळविण्यात आले. त्यानंतर गुरुवारी दुपारी १२ वाजता शोधमोहीम सुरू होऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले.
पुढे वाचा ..तर दाेघीही वाचू शकल्या असत्या, खत प्रकल्प नेहमीच ठरतोय वादाचा विषय,