आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिव्हिलमध्ये रुग्ण पळवणाऱ्यांचा सुळसुळाट, आरोग्य विभागास ज्ञात असूनही दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या शहरी आणि ग्रामीण भागातून दाखल होणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना उपचारांबाबत चुकीची माहिती देत त्यांचे रुग्ण खासगी रुग्णालयात पळवून नेण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत.

अपघातग्रस्त रुग्णांना खासगी रुग्णालयात नेत असताना या दलालांमध्ये वाद झाल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोग्य विभागास सर्व काही ज्ञात असूनही याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे.
शासकीय जिल्हा रुग्णालयात रुग्ण पळून जाण्याचे प्रकार नवीन नाहीत. पैशाअभावी रुग्ण पळून जातात. मात्र, काही आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयांचे दलाल हेरतात. ‘रुग्णालयात बहुतांश रुग्ण बरे होत नाहीत. व्यवस्थित उपचार होत नाहीत’ असे सांगून रुग्णांच्या नातेवाइकांचे मन वळविले जाते. ठरलेल्या खासगी रुग्णालयात संबंधित रुग्ण पाठविला जातो. येथे संबंधित डॉक्टरच्या ओळखीने रुग्ण दाखल होतो.
काही रक्कम भरल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्या डॉक्टरला कमिशन दिले जाते. यातून संबंधित दलालास कमिशन दिले जाते. काही एजंटांचे मोठ्या हॉस्पिटलशी थेट संपर्क असल्याचेही बोलले जाते. रुग्णालयाच्या डॉक्टरांसह कर्मचारी देखील या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याची चर्चा अाहे.
कमिशनसाठी खटपट : खासगीरुग्णालयात दाखल करताच रुग्णांच्या नातेवाइकांकडून डिपॉझीट घेतले जाते. यातून काही रक्कम लगेच संबंधित एजंट अथवा डॉक्टरांना दिली जाते. बहुतांश डॉक्टरांनी नावाला क्लिनिक सुरू केले असून, नामवंत दवाखान्यांशी अभद्र करार केला आहे.
कर्मचाऱ्यांसह डॉक्टरही सक्रिय
अपघात झाल्यानंतर पोलिसांच्या मदतीने रुग्णांना शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. अपघाताची माहिती कळताच काही कर्मचारी संबधितांना कळवतात. रुग्णांना चुकीची माहिती देऊन रुग्णांना पळविले जाते.
रुग्णाला डिस्चार्जची प्रक्रिया अगदीच सोपी
शासकीय जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्जसाठी सोपी प्रक्रिया आहे. रुग्णाने घरी जाण्याची अथवा दुसऱ्या रुग्णालयात जाण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्या रुग्णांसह नातेवाइकांकडून ‘आपल्या जबाबदारीवर घेऊन जातो’ असे लिहून घेतले जाते. अशा प्रसंगी ‘का जातो?’ असे विचारणाऱ्या डॉक्टरांची संख्या फारच कमी आहे.
गैरप्रकारांना थारा नाही
- रुग्णालयात रुग्ण पळविणाऱ्यांवर कादेशीर कारवाई होऊ शकते. रुग्णालयात अशा प्रकारे कोणी रुग्ण खासगी दवाखान्यात असेल तर आरोग्य विभागाकडून कठोर कारवाई केली जाईल.
डॉ. जे. एम. होले, अतिरिक्त शल्य चिकित्सक