आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण निर्मूलन 16 पासून, उपायुक्त बहिरम यांचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील माेक्याच्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात व्हीअायपींचे दाैरे अडथळे ठरत असल्याचे सांगत उपायुक्त राेहिदास बहिरम यांनी साेमवार ( दि. १६) पासून अतिक्रमण माेहिमेला सुरुवात हाेईल, असे सांगितले.
शहरातील अनेक माेक्याच्या रस्त्यांवर अतिक्रमणे काढण्यासाठी नगररचना विभागाने रेखांकन केले हाेते. प्रत्यक्षात कारवाई हाेत नसल्यामुळे लाेकांमधून नाराजीचे वातावरण हाेते. अतिक्रमण माेहीम थंडावण्यामागे व्यापाऱ्यांचा दबाव असल्याची चर्चा हाेती. मात्र, त्याचे खंडन करीत बहिरम यांनी साेमवारपासून अतिक्रमण माेहीम सुरू केली जाईल, असे सांगितले. पाेलिस बंदाेबस्त नसल्यामुळे कारवाई थांबवल्याचे सांगत मंगळवारी सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर केवळ बंदाेबस्त नसल्यामुळे सहवासनगर येथील माेहीम थांबवावी लागली असाही खुलासा त्यांनी केली. बुधवारी शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून, त्यानंतर काही व्हीअायपींच्या दाैऱ्यात पाेलिस व्यस्त अाहेत. या पार्श्वभूमीवर साेमवारपासून माेहीम सुरू हाेईल, असेही त्यांनी सांगितले.