आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mistakes In Hall Ticket, Twelth Standard Students Unhappy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉल तिकिटांतील चुकांमुळे धडधड, बारावीच्या विद्यार्थ्यांना मन:स्ताप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - येत्या२१ तारखेपासून सुरू होणा-या बारावी परीक्षेसाठीच्या हॉल तिकिटांचे वाटप बहुतांश महाविद्यालयांतून सोमवार (दि. २) पासून सुरू झाले आहे. मात्र, या हॉल तिकिटांत असंख्य चुका आढळून येत आहेत. नावात घोळ, लिंगबदल, तसेच छायाचित्रेदेखील बदललेली अशी चुकांची अनेक प्रकरणे समोर आल्याने विद्यार्थ्यांची धडधड ऐन अभ्यासाच्या काळात आणखी वाढली आहे. दरम्यान, बुधवारी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी हॉल तिकिटांतील चुका संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनाच दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा सुरू आहेत. त्यासाठी हाॅल तिकीट वाटप सुरू आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांच्या हाॅल तिकिटांमध्ये असंख्य चुका असल्याचे निदर्शनास आले आहे. नाव-आडनावात घाेळ, काॅमर्सऐवजी अार्टस असे शाखाबदल, मेलच्या जागी फी मेल, अाईच्या जागेवर वडिलांचे नाव, पेपरच्या उत्तराच्या भाषेत इंग्रजीऐवजी मराठी मराठीऐवजी इंग्रजी, तसेच छायाचित्रेदेखील बदलल्याची अनेक उदाहरणे समाेर अाली अाहेत. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मन:स्ताप सहन करावा लागत अाहे. दरम्यान, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर असलेल्या चुका महाविद्यालयांनीच दुरुस्त कराव्यात, असे लेखी आदेश बोर्डाने सर्व महाविद्यालयांना दिले आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठी बोर्डाकडे धावाधाव करावी लागणार नसल्याने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
महाविद्यालयांचीजबाबदारी हॉलतिकिटांची नोंदणी ऑनलाइन करण्यात आली आहे. काही महाविद्यालयांच्या लिपिकांकडूनच नोंदणी करताना चुका राहिल्याचे बोर्डाच्या परीक्षा मंडळातील वरिष्ठ अधिका-याने मान्य केले. अनेक चुका बोर्डाने दुरुस्तही केल्या. मात्र, नावे चुकणे, छायाचित्रांत अदलाबदल होणे यासाठी काहीअंशी महाविद्यालयेच जबाबदार असल्याचे बोर्डाच्या काही अधिका-यांचे म्हणणे आहे.
गतवर्षीदहावीत घाेळ : गतवर्षीदहावीच्या हाॅल तिकिटांमध्येदेखील अशाच प्रकारचे घाेळ निर्माण झाला हाेता. त्या वेळी केवळ शाळेचे ओळखपत्र दाखवून परीक्षेला बसू देण्यात अाले हाेते. यंदाही घाेळ झाल्याने तशीच स्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
१६ तारखेपर्यंत मंडळातही दुरुस्ती
ज्याविद्यार्थ्यांच्या नावात स्पेलिंगच्या चुका आहेत, हॉल तिकिटांवर छायाचित्रे नाहीत, सीट नंबर चुकीचे छापून आले आहेत, त्यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून किंवा मंडळाच्या विभागीय कार्यालयातून १६ फेब्रुवारीपर्यंत दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
{ हॉल तिकिटावरील xxx याचा अर्थ त्या संबंधित विषयात विद्यार्थ्यांना सूट असा आहे.
{ प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना हॉल तिकिटे देण्यापूर्वी त्याच्यावरील नाव, छायाचित्र, नाव, केंद्र आणि उत्तर लिहिण्याची भाषा आदींंची तपासणी करून द्यावी.
{ हॉल तिकिटांवर नाव, छायाचित्र, विषय, केंद्र इतर चुका असतील, तर प्राचार्यांनी योग्य दुरुस्ती करून, स्वाक्षरी करून महाविद्यालयाचा शिक्का मारून द्यावा.
..असे आहेत आदेश
प्राचार्यांनी हॉल तिकिटांवरील विषयांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.
गैरसोय टळणार
प्राचार्यांनाचदुरुस्तीचे अधिकार दिल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे. डॉ.नूर-ए-ईलाही शाह, उपप्राचार्य,नॅशनल कनिष्ठ महाविद्यालय

दुरुस्ती नि:शुल्क
हॉल तिकिटांवरील चुका नि:शुल्क दुरुस्त करण्याची जबाबदारी प्राचार्यांवर आहे. दत्तात्रयजगताप, विभागीयअध्यक्ष, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

काॅमर्सएेवजी अार्ट‌्स शाखा तेच विषय अाल्याने एेनवेळी कुणाकडे जायचे आणि परीक्षा देताना नक्की कुठला पेपर हातात येईल, असा संभ्रम निर्माण झाला अाहे. इंग्रजीएेवजी मराठी भाषा अाल्याने पेपर काेणत्या भाषेत द्यायचा तेदेखील समजेनासे झाले अाहे. -परिमल फड, विद्यार्थी
माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात बुधवारी बारावीच्या हॉल तिकिटांतील चुकांसंदर्भात अधिका-यांसमवेत चर्चा करताना विद्यार्थी विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी.

..अन्यथा तीव्र आंदोलन करणार
शहरातीलबारावीच्या अनेक विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांत असंख्य प्रकारच्या चुका झालेल्या आहेत. शिक्षण मंडळाने या चुका दुरुस्त करण्याची उपाययोजना करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. चिन्मयगाढे, अध्यक्ष,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस