आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस साेशल अकाऊंटद्वारे युवतीची बदनामी; महाविद्यालयातील सहाध्यायीचे गैरकृत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक: सोशल मीडियाच्या अाधारे मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी फेसबुक, व्हॉट‌्सअपचा सध्या मोठ्या प्रमाणावर वापर होत असला तरी महिला युवतींचा गैरफायदा घेणाऱ्या अपप्रवृत्तीदेखील अलीकडे वाढू लागल्या आहेत. अशाच प्रकारे एका महाविद्यालयीन युवतीचे बोगस फेसबुक खाते उघडून तिची बदनामी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला आहे. 
 
फेसबुकवर फोटो एडिट करून इंग्रजीमध्ये नाव-पत्ता टाकत ‘माय गर्लफ्रेंड’ असा बदनामीकारक मजकूर फेसबुक अकाऊंटवर टाकण्याचा प्रकार पीडित युवतीच्या लक्षात अाला. सदर युवतीने तत्काळ सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नाेंदवली. सायबर पोलिसांनी संशयिताचा तंत्रविश्लेषणाच्या अाधारे माग काढला. यामध्ये युवती शिकत असलेल्या महाविद्यालयातच संशयितदेखील शिक्षण घेत असल्याचे निष्पन्न झाले हाेते. युवतीच्या तक्रारीनुसार संशयिताच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार तपास करत आहेत. आजपर्यंत फेसबुकद्वारे बदनामीचे सहा गुन्हे सायबर पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. 
 
एअर टिकीट बुकिंग कन्फर्म असल्याचे सांगत फसवणूक 
ऑनलाइन व्यवहारात सर्वसामान्य नागरिकांच्या फसवणूकीचे प्रकार सुरू असताना लष्कराच्या मेजरला ऑनलाइन एअर तिकीट बुकींग झाल्याचे सांगत ४८ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
याप्रकरणी शशांक लांबा (रा. मेजर, स्कुल ऑफ अर्टलरी सेंटर, देवळाली कँप) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार ऑनलाइन एअर टिकीट बुक करण्यासाठी मे राेजी इंटरनेटवर ट्रॅव्हल कंपनी शोधली. या कंपनीचा एजंट मनिष मलीक याच्याशी मोबाइलवरून संपर्क साधून एअर इंडियाचे तीन तिकीट बुक करण्यास सांगितले. लांबा यांनी तिकीट कन्फर्म आहे का नाही याबाबत विचारणा केली. संबधीत एजंटने त्यांच्या व्हॉटस‌्अॅप नंबर अाणि इ-मेल आयडीवर तिकीट कर्न्फम असल्याचे मेसेज पाठवत विश्वास संपादन केला. खात्री झाल्यानंतर लांबा यांनी ४८ हजार रुपये बँकींगद्वारे ट्रान्सफर केले. संशयित एजंटकडून नंतर काही प्रतिसाद मिळल्याने संबधीत ट्रॅव्हल एजन्सीचा शोध घेतला असता ती बोगस असल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येतात मेजर लांबा यांनी देवळाली कँम्प पोलिस ठाण्यात संशयीत एजंटच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरिक्षक सुभाष डवले तपास करत आहेत. इंटरनेट बँकींच्या साह्याने विविध वस्तू ,रेल्वे, विमान टिकिट ऑनलाईन खरेदी करण्याचे व्यवहार होत असल्याने फसवणूकीचे प्रकारांत वाढ झाली आहे.
 
तीन लाख रुपये दंडाची शिक्षा 
फेसबुक अथवाइतर सोशल मीडियावर बोगस अकाऊंट उघडून महिला-युवतींची फसवणूक केल्यास तीन लाख रुपये दंड आणि तीन वर्षे कारावासाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. अशा फसवणुकीचे प्रकार वाढत अाहेत. अशा प्रकारे फसवणूक होत असल्यास, अथवा झाली असल्यास संबंधितांनी तत्काळ सायबर पोलिसांमध्ये संपर्क साधावा. -विजयकुमार मगर, उपआयुक्त 
बातम्या आणखी आहेत...