आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार 15, नाशिकसंबंधी प्रश्न अवघे 40; सानप, फरांदे, आहेर, गावित, शेख शून्यावरच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विधिमंडळ म्हणजे लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न मांडण्याचे आणि ते सोडवून घेण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ. या सभागृहात लोकप्रतिनिधींची कामगिरी अत्यंत महत्त्वाची ठरते. नाशिक जिल्ह्यातून आज विधानसभेत १५ आमदार आहेत. त्यापैकी राज्यमंत्री दादा भुसे सोडले तर बाकीच्या आमदारांसाठी अधिवेशन हे नाशिककरांचे प्रश्न मांडण्याचे महत्त्वाचे साधन होते. २४ जुलै ते १२ ऑगस्ट चाललेल्या पावसाळी अधिवेशनातील तारांकित प्रश्नांची यादी पाहता, नाशिकच्या आमदारांची कामगिरी सुमार दिसते. विशेष म्हणजे, नाशिकला दत्तक घेणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या आमदारांची कामगिरीही तर अधिकच सुस्त दिसते. आपण निवडून दिलेले आमदार, आपल्या प्रश्नांची विधिमंडळासारख्या महत्त्वाच्या सभागृहाच्या माध्यमातून किती तड लावतात याचा ‘दिव्य मराठी’ने नाशिककरांसाठी घेतलेला हा लेखाजोखा. 

नाशिककर आमदारांनी मांडले हे प्रश्न 
पायाभूत सुविधा : २६ 
शेतीविषयक : २१ 
गैरव्यवहार : ११ 
शिक्षण : ०४ 
आरोग्य : ०३ 
उद्योग : ०१ 
शहर व्यवस्था : ०० 

हे प्रश्नऑनलाइन टाकावे लागतात. माझ्याकडे ती यंत्रणा नाही, त्यामुळे मी प्रश्नच टाकले नाहीत.
- जे. पी. गावित, आमदार, माकप 
मी चारलक्षवेधी दिल्या होत्या. पण अधिवेशनच व्यवस्थित चालले नाही, त्यामुळे त्या लागल्या नाहीत. 
- देवयानी फरांदे, आमदार, भाजप 
बंद लघुउद्योग,अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, वाढीव वीजबिले आणि धोकादायक मोबाइल टॉवर्स या लक्षवेधी सूचना मी दिल्या होत्या.
- राहुलआहेर, आमदार, भाजप 
‘चार प्रश्नटाकले होते, पण लागले नाहीत. कारण कळले नाही. माहीत नाही का लागले नाही.’ 
- बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष आणि भाजप आमदार 

यांनी एकही प्रश्न विचारला नाही : बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, राहुल अाहेर, जिवा पांडू गावित, अासीफ शेख 
यांनी पेक्षा ५ कमी प्रश्न विचारले : अनिल कदम, याेगेश घाेलप, राजाभाऊ वाजे, पंकज भुजबळ, छगन भुजबळ 
यांनी ७ प्रश्न विचारले : निर्मला गावित, नरहरी झिरवाळ 
यांनी १३ प्रश्न विचारले : सीमा हिरे, दीपिका चव्हाण 

राष्ट्रवादीचे हेमंत टकले, जयंत जाधव आणि भाजपचे अपूर्व हिरे हे तीन नाशिककर आमदार विधान परिषदेवर आहेत. त्यात राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव आणि भाजपचे अपूर्व हिरे यांचे प्रश्न नाशिकशी निगडित आहेत, परंतु हेमंत टकले यांचे बहुतांश प्रश्न राज्याशी आणि इतर शहर, जिल्ह्यांशी निगडित आहेत. तरीही विधान परिषदेतील आमदारांनी नाशिकशी संबंधित ५१ प्रश्न या अधिवेशनात विचारले. त्यांचेही प्रमाण विधानसभेतील आमदारांपेक्षा कमी आहे. 

परिषदेतील जोमात, सभेतील कोमात 
या अधिवेशनात, नाशिकमधील आमदारांनी विधानसभेत एकूण १७० प्रश्न मांडले. त्यापैकी फक्त ४० प्रश्न नाशिक जिल्ह्यातील विषयांशी निगडित होते. त्यात नाशिक शहराचे अवघे दाेन प्रश्न. त्यातही भाजप शहराध्यक्ष असलेले आमदार बाळासाहेब सानप, प्रा देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, मालेगावचे काँग्रेसचे आमदार आसीफ शेख आणि पेठचे माकप आमदार जिवा पांडू गावित यांनी या अधिवेशनात एकही तारांकित प्रश्न विचारला नाही. तसेच, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या प्रश्नांची संख्या अधिक दिसत असली तरी त्यात नाशिकचे प्रश्न कमी अाहेत. राष्ट्रवादीचे आमदार झिरवाळ यांचे नाव सर्वाधिक प्रश्नांसोबत जोडलेले दिसते, मात्र, त्यांनी स्वतंत्रपणे दिंडाेरी मतदारसंघाचा किंवा नाशिक जिल्ह्याचा एकही प्रश्न विचारलेला नाही. शिवसेनेच्या तीन अामदारांनी फक्त प्रश्न मांडले. 
बातम्या आणखी आहेत...