आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mla Anil Kadam Gives Resignation To Udhav Thackeray

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांना शिवीगाळ, आमदार अनिल कदम यांचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर महिला कर्मचा-यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेनेचे वादग्रस्त आमदार अनिल कदम यांनी शनिवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपविला.

तीन दिवसांपूर्वी आमदार कदम आणि तेथील महिला कर्मचा-यांमध्ये टोल आकारणीवरून वाद झाला होता. कदम यांनी महिला कर्मचारी व महिला व्यवस्थापकांना शिवीगाळ केल्याचे वृत्त झळकले. यामुळे कदम अडचणीत सापडले होते. त्यातच उद्धव ठाकरे शनिवारी नाशिक व शिर्डी दौ-यावर आले. ओझर विमानतळावर कदम यांनी त्यांच्याकडे राजीनामा सादर केला.

पश्चात्तापातून राजीनामा
अनिल कदम यांना मी चांगले ओळखतो. त्यांनी वापरलेले शब्द निश्चितच उचित नसून, घटनेचा पश्चात्ताप झाल्यानेच त्यांनी राजीनामा दिला. यासंदर्भात कदमांशी चर्चेअंतीच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यानंतर एक शब्दही न बोलता उद्धव ठाकरे नाशिककडे रवाना झाले.