आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • MLA Anil Kadam Is Family Loveable Person Uddhav Thakare

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार अनिल कदम हे तर कुटुंबवत्सल व्यक्ती; उध्‍दव ठाकरेंनी केली पाठराखण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महिलांचा अपमान करणे ही शिवसेनेची संस्कृती नाही. त्यामुळे आमदार अनिल कदम यांनी टोलनाक्यावर केलेले कृत्य हे समर्थनीय नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेनेच्या मेळाव्यात स्पष्ट केले. त्याच वेळी कदम यांना ‘कुटुंबवत्सल व्यक्ती’ असे प्रमाणपत्र देत पक्षप्रमुखांनी त्यांची पाठराखणही केली. ‘कदम यांच्या सहनशीलतेचा बांध का फुटला? याचाही विचार करण्याची गरज आहे. त्यांना कोणी सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत असल्यास तो आम्ही हाणून पाडू’, असेही ठाकरेंनी स्पष्ट केले.


आमदार कदम यांनी काही दिवसांपूर्वीच पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर तोडफोड करत तेथील महिला कर्मचा-यांना शिवीगाळ केली होती. या घटनेचा जिल्ह्यात विविध पातळ्यांवरून निषेध करण्यात आला. त्यावर नैतिक जबाबदारी स्वीकारून कदम यांनी आमदारकीचा राजीनामा पक्षाकडे सोपवला. या पार्श्वभूमीवर नाशिक दौ-यावर आलेले उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, त्यांनी कदम यांना ‘कुटुंबवत्सल’ प्रमाणपत्र दिल्यामुळे त्यांचा राजीनामा हे केवळ नाट्य असल्याचेच उघड झाले आहे.


काय म्हणाले उद्धव ठाकरे
* माता-भगिनींच्या संरक्षणाची आणि त्यांचा आदर करण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहे. त्यामुळे कदम यांचे वर्तन समर्थनीय नाही. कदम यांनी त्यांची बाजू मांडली; पण त्यांच्या सहनशीलतेचा बांध का फुटला, याचाही विचार होणे गरजेचे आहे.
* कदम सहजासहजी अशी भाषा वापरणार नाहीत. संबंधित टोलनाक्याचा विचार केल्यास यापूर्वी येथे अनेक आंदोलने झाली आहेत. त्या आंदोलनांची कारणमीमांसाही तपासणे आवश्यक आहे.
* मी स्वत: टोलनाका ज्यांच्या ताब्यात आहे त्या ‘एल अँड टी’कडून चित्रीकरण मागवले आहे.
* डॉ. दाभोलकरांचे मारेकरी सीसीटीव्हीत दिसत नाहीत. मुंबईतील बलात्कारही अस्पष्ट दिसतात. मात्र, आमचे आमदार मात्र ठळकपणे दाखवले जातात. कदम दोषी असतील तर राजीनामा घेऊच; परंतु अडकवण्याचा प्रयत्न असेल तर हाणून पाडू.
* यापुढे जर कोणी माता-भगिनींना असभ्य भाषा वापरली तर ती सहन करणार नाही.