आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशासाठी सुयोग्य समन्वय, प्रामाणिकपणा महत्त्वाचा- आमदार बाळासाहेब थोरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कामाचे नियाेजन, त्यातील प्रामाणिकपणा अाणि सातत्य यांचा सुयाेग्य समन्वय यशासाठी महत्त्वाचा असून, प्रत्येक पक्षाचा अामदार त्यांच्या मतदारसंघात यशस्वी हाेण्यासाठी प्रयत्न करीत असताे. अामदाराला एका बाजूला विराेधी पक्ष, तर दुसरीकडे पक्षातीलच विराेधक यांच्याशी संघर्ष करून मतदारसंघातील लाेकांना खुश ठेवण्यासाठी पुरेसा िनधीही अाणावा लागताे, तरच जनता सातत्याने विश्वास दाखविते, असे प्रतिपादन माजी मंत्री अामदार बाळासाहेब थाेरात यांनी केले.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कै. माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा कार्यक्षम अामदार पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब थाेरात बाेलत हाेते. व्यासपीठावर कांचन बाळासाहेब थाेरात, सावानाच्या कार्याध्यक्षा िवनया केळकर, डाॅ. शाेभा नेेर्लीकर, कर्मवीर काकासाहेब वाघ िशक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, वाचनालयाचे अध्यक्ष प्राचार्य विलास अाैरंगाबादकर, माजी अामदार जयप्रकाश छाजेड, वंदनराव पाेतनीस उपस्थित हाेते.वयाच्या ३१ व्या वर्षी पहिल्यांचा अामदार झालाे. तेव्हापासून सलग सातव्यांदा जनतेने मला विधानसभेत नेतृत्व करायची संधी िदल्याचे बाळासाहेब थाेरात यांनी स्पष्ट केले. पंधरा वर्षे अामदार राहिल्यानंतर मंत्रिपदाची संधी िमळाली. त्यानंतर पहिल्यांदा पाण्याचा सुयाेग्य वापर व्हावा, यावर भर िदला, त्यानुसारच िदंडाेरी तालुक्यातील वाघाड धरण शेतकऱ्यांच्या ताब्यात िदले. शेततळे ही नाशिकमधून सुरू झालेली याेजना अाम्ही राज्यभर पाेहाेचविल्याचे थाेरात यांनी सांगितले. राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील नेतृत्व विराेधीपक्षात असल्याने समाेर अाले. प्रश्न मांडण्यात अाणि ते साेडवून घेण्याची त्यांची हाताेटी वाखाणण्याजाेगी असल्यानेच मुख्यमंत्रिपद त्यांच्यापर्यंत चालत अाल्याचे थाेरात यांनी स्पष्ट केले.

मराठा विद्याप्रसारक संस्थेत शिक्षण घेणाऱ्या भाऊसाहेब थाेरातांनी उभारलेल्या शिक्षणसंस्थेचा विकास बाळासाहेबांनी या पद्धतीने केला की, ती संस्था अाज राज्यापुढे अादर्श ठरल्याचे क. का. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी सांगत बाळासाहेबांनी अाता केवळ संगमनेरचे प्रतिनिधी म्हणून रहाता नाशिकचेही पालकत्व स्वीकारावे, असे अावाहन केले.
बाळासाहेब थाेरात यांना कार्यक्षम अामदार पुरस्कार प्रदान करताना बाळासाहेब वाघ. समवेत कांचन थाेरात, ‘सावाना’च्या कार्याध्यक्षा िवनया केळकर, डाॅ. शाेभा नेेर्लीकर, प्राचार्य विलास अाैरंगाबादकर, माजी अामदार जयप्रकाश छाजेड, वंदनराव पाेतनीस.

बाळासाहेबांचे दातृत्व
सावानानेिदलेल्या या कार्यक्षम आमदार पुरस्कारातील पन्नास हजार रुपयांच्या रकमेत अजून अकरा हजार रुपयांची भर घालत एकसष्ट हजार रुपयांचा िनधी बाळासाहेब थाेरात यांनी नाशिकच्या साहित्य परिषदेस देत असल्याची घाेषणा या वेळी केली.
मतदारसंघ खूप महत्त्वाचा
दुसऱ्यामहायुद्धादरम्यान वाॅररूममध्ये पंतप्रधान िवन्स्टन चर्चिल मंत्र्यांसमवेत युद्धासंबंधी महत्त्वाची चर्चा करीत असताना अचानक उठून बाहेर गेले. त्यानंतर पुन्हा काही वेळाने परतल्यावर मंत्र्यांनी बाहेर का गेले म्हणून विचारले असता, चर्चिल म्हणाले, मतदारसंघातील एक म्हातारी गाऱ्हाणे घेऊन अाली हाेती. यावरून मतदारसंघ िकती महत्त्वाचा असताे, याचे उदाहारण थाेरात यांनी देताच हशा िपकला.