आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनमाडमध्‍ये आमदाराच्या कारने चिरडल्याने एकाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला- मध्य प्रदेशातील एका आमदाराच्या वाहनाने दुचाकी चालकाला उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नगर- मनमाड रस्त्यावर शुक्रवारी हा अपघात झाला. अपघातानंतर फरार झालेल्या कारचालकाला नागरिकांनी पाठलाग करून पकडले व चोप दिला.


धारच्या आमदार नीना शर्मा या शिर्डी येथे टाटा सफारीने जात होत्या. मनमाडच्या शासकीय विश्रामगृहाजवळ दुपारी चारच्या सुमारास विकास बाळाजी वराडे (45, रा. खिर्डीगणेश, कोपरगाव) हे दुचाकीवर जात असताना शर्मा यांच्या गाडीने त्यांना धडक दिली. या अपघातात शर्मा गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शिर्डीच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने कार कोपरगावच्या दिशेने दामटली. नागरिकांनी त्याचा पाठलाग केला. पिंपळगावच्या टोलनाक्यावर गाठून चालक इर्शाद अहमद शहजाद याला बेदम चोप दिला.