आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार जाधवांचा अर्ज पुन्हा फेटाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - विधानपरिषद निवडणुकीत अँड. शिवाजी सहाणे यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेमध्ये कौन्सिल काउंटर क्लेम दाखल न केल्यामुळे आमदार जयंत जाधव यांचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्या विरुद्ध जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले अपीलही फेटाळल्यानंतर पुन्हा जाधव यांनी जबाबात दुरुस्ती अर्ज उच्च न्यायालयात केला असता, तोही न्यायालयाने फेटाळला.

बाद करण्यात आलेली मते मोजण्यात यावी, असा जबाब दुरुस्त करण्याची परवानगी जाधव यांनी उच्च न्यायालयात शुक्रवारी (दि. 6) मागितली. त्यावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाल्यानंतर शिवाजी सहाणे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ज्ञ महेश जेठमलानी यांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद मान्य करीत जाधव यांनी केलेली मागणी मुदतबाह्य असल्याने तसेच याचिकेत बाद झालेल्या मतांचा उल्लेख केलेला नसल्याने पूर्वीप्रमाणे हा अर्ज पुन्हा फेटाळण्यात आला, अशी माहिती अँड. सहाणे यांनी दिली. पुढील सुनावणी 25 सप्टेंबर रोजी होणार आहे.