आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार जयंत जाधवांची प्रत्यारोप याचिका फेटाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विधान परिषद निवडणुकीत मागील वर्षी पराभव झालेले उमेदवार अँड. शिवाजी सहाणे यांनी दाखल केलेल्या दाव्यावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवर आमदार जाधव यांनी दाखल केलेली प्रत्यारोप याचिका फेटाळून लावली. दरम्यान, उच्च न्यायालयात 30 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

25 मे 2012 रोजी विधान परिषदेची निवडणूक होऊन 28 मे रोजी झालेल्या मतमोजणीत उमेदवार अँड. सहाणे यांची चार मते निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी बाद ठरविली होती. जाधव आणि सहाणे यांना प्रत्येकी 221 मते मिळाली, असे सांगून समसमान मतांमुळे निवडणुकीचा निकाल चिठ्ठीद्वारे घोषित करण्यात आला. त्यात सहाणे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना पराभूत घोषित करण्यात आले होते. या निकालाविरुध्द सहाणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात जाधव यांनी काउंटर क्लेम दाखल केला होता. 16 ऑगस्ट रोजी दाखल याचिका मुदतीत सादर केली नसल्याचे कारण देऊन उच्च न्यायालयाने ती रद्द केली होती. या निकालाविरुध्द जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. 27 ऑगस्ट रोजी जाधव यांनी दाखल केलेले अपील खंडपीठाने फेटाळल्याची माहिती अँड. सहाणे यांनी दिली.