आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mla Vasant Gite Rumor Of Change Party Issue At Nashik

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राम कदमानंतर वसंत गितेच्‍या पक्षांतराची अफवा, मनसेच्या गोटात उडाली खळबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मनसेचे घाटकोपरमधील आमदार राम कदम यांच्या भाजप प्रवेशानंतर गुरुवारी रात्रीपासून आमदार वसंत गिते हेही भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा अफवा पसरल्यानंतर मनसेच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली. नाशिकचे काही स्थानिक पदाधिकारी मुंबईत असल्याने त्यांच्या माध्यमातून या वृत्ताची खातरजमा केली जात होती. दरम्यान, गिते यांनी मनसे कदापि सोडणार नाही तसेच विरोधकांनी सोशल मीडियातून कुरापती काढण्यापेक्षा रिंगणात उतरून दोन हात करावे, असे आव्हान दिले.

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्यानिमित्ताने अधिकारांवर गदा आणल्याने नाराज गिते यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्यातच बंडाचे निशाण फडकवले होते. अर्थात, त्यावेळीही गिते यांनी नाराज नसून, दुखऱ्या पायामुळे दौऱ्यात सहभागी झालाे नसल्याचे कारण दिले होते. मात्र, गिते संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांच्यातील मतभेद लपून राहिले नव्हते. मात्र, मनसेचे आमदार नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर यांनी शिष्टाई करून राज यांच्यासमोर गितेंना पाचारण केले. त्यानंतर मुंबईत गितेंच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर खुद्द राज यांनी हजेरी लावून झाले गेले गंगेला मिळाले, असा संदेश दिला होता. महापौर निवडणुकीत प्रमुख बोलाचालीची सूत्रे गिते यांच्याकडेच होती. त्यामुळे तेही नाराजी विसरून पक्षात सक्रिय झाल्याचे चित्र होते. अशातच गुरुवारी गिते हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली. शविसेना भाजपची युती तुटली तर नाशिक मध्यमधून गिते हे भाजपकडून निवडणूक लढवतील, असाही युक्तिवाद केला जाऊ लागला. शुक्रवारी सकाळपासून सोशल मीडियावर एका वृत्तवाहिनीने गितेंच्या फाेटाेसहित भाजपत प्रवेश करीत असल्याचे वृत्त दिल्‍याची कॉपी फिरू लागली. त्यानंतर मात्र चर्चेला उधाण आले होते.

विरोधकांचे षड‌्यंत्र
मनसे सोडण्याचा प्रश्नच नसून, राज ठाकरे यांच्याबरोबर आरंभापासूनच पक्ष उभारणीसाठी प्रयत्न केले. पक्षापेक्षा कोणीही मोठे नाही. हे विरोधकांचे षड‌्यंत्र असून, त्यांना निवडणूक रिंगणात चोख उत्तर दिले जाईल. वसंतगिते, आमदार,मनसे