आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेच्या अाणखी तिघा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - नाशिक महापालिकेत सर्वाधिक ४० जागा निवडून अाणत करिश्मा करणाऱ्या मनसेच्या राज ठाकरे यांच्या पक्षातून गळती सुरूच असून, गुरुवारी (दि. २४) अाणखी तिघा नगरसेवकांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसेनेत प्रवेश केला. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुदाम काेंबडे यांच्यापाठाेपाठ सिडकाेतील नगरसेविका शीतल भामरे, सुवर्णा मटाले अाणि पंचवटीतील गणेश चव्हाण या तिघांच्या पक्षांतरामुळे पक्षाला माेठा धक्का बसला असून, अाता पक्षात केवळ १५ नगरसेवक शिल्लक राहिले अाहेत. तसेच, शेकापचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक जे. टी. शिंदे यांनीही ‘माताेश्री’वर शिवबंधन बांधले. या पक्षप्रवेशामुळे सद्यस्थितीत प्रभागांमध्ये शिवसेनेकडून इच्छुक असलेल्यांची माेठी काेंडी झाली असून, त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली अाहे.
सिडकाेतील प्रभाग क्रमांक ४४ च्या नगरसेविका शीतल संजय भामरे, प्रभाग ४९ च्या नगरसेविका सुवर्णा मटाले पंचवटीतील प्रभाग एकचे नगरसेवक शिक्षण मंडळ उपसभापती गणेश चव्हाण यांनी मनसेला साेडचिठ्ठी देत ‘माताेश्री’वर शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत प्रवेश केला. याप्रसंगी सुनील माधवराव खाेडे यांनीही पक्षप्रवेश केला असून, संपर्कप्रमुख अजय चाैधरी, उपनेते बबनराव घाेलप, महानगरप्रमुख अजय बाेरस्ते, नगरसेवक सूर्यकांत लवटे, विलास शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा साेहळा पार पडला. पालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यापासून अनेक विद्यमान नगरसेवकांना प्रभागच राहिला नसल्याने पक्षांतराची माेठी लाट अाली अाहे. सर्वच राजकीय पक्षांत पक्षांतराचे वारे वाहत असताना त्याचा सर्वाधिक फटका सत्ताधारी मनसेला बसला असून, निम्म्याहून अधिक नगरसेवकांनी शिवसेना-भाजपची वाट धरली अाहे. तरीही पक्षश्रेष्ठींकडून त्याची कुठलीही दखल घेतली जात नसल्याने पक्षांतराचा सपाटा सुरूच अाहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी अामदार वसंत गिते, पक्षाचे पहिले महापाैर अॅड. यतिन वाघ यांच्यापाठाेपाठ जिल्हाध्यक्ष सुदाम काेंबडे यांनी पक्ष साेडला असून, गत वर्ष-दाेन वर्षात पक्षाची अवस्था दयनीय झाली अाहे. त्यातच अागामी महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिनाम झाल्याने इच्छुक अाणि विद्यमान नगरसेवकांकडून प्रभागाची चाचपणी करीत स्थानिक पक्षाची ताकद लक्षात घेता सेना-भाजपलाच सर्वाधिक पसंती दर्शविली जात अाहे. प्रवेश साेहळ्यास अॅड. यतिन वाघ, शिवाजी सहाणे, डी. जी. सूर्यवंशी, देवानंद बिरारी, शिवाजी निमसे, मल्हारी मते, अजीम सय्यद, गोकुळ पिंगळे, शरद देवरे, सचिन राणे, संजय भामरे, दीपक मटाले, केशव कासार, अमाेल सूर्यवंशी, विश्वास तांबे आदी उपस्थित होते.

शिवसैनिकांत अस्वस्थता : मनसेच्याबहुतांशी विद्यमान नगरसेवकांच्या कामकाजाविषयी मुळात त्यांच्या प्रभागात नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असताना, त्याची संधी पाच वर्षांपासून प्रभागात स्थानिकांशी नियमित संपर्कात राहून विविध उपक्रम राबविणाऱ्या शिवसेनेच्या इच्छुकांनी साधली हाेती. निश्चितपणे त्यांना विजयाची संधी असताना अचानक मनसेच्या नगरसेवकांना थेट पक्षात प्रवेश दिला जात असल्याने अशा इच्छुकांची माेठी काेंडी झाली अाहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी किमान स्थानिक इच्छुक निष्ठावंतांना विश्वासात घेऊन प्रवेश द्यावा, अशी प्रामाणिक इच्छा बाेलून दाखविली जात अाहे.
पक्षाची सध्याची स्थती
२३ नोव्हेंबर २०१६ मध्ये पक्षत्याग केलेले
१७ नोव्हेंबर २०१६ मध्ये पक्षत्याग केलेले
१८ ऑक्टोबर २०१६ मध्ये पक्षत्याग केलेले
सप्टेंबर २०१६ मध्ये पक्षत्याग केलेले
मार्च २०१२ मध्ये एकूण नगरसेवक

सिडकाेत उरले दाेनच नगरसेवक

गतमहापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेने जाेरदार मुसंडी मारत तब्बल नगरसेवक निवडून अाणले हाेते. मात्र, सद्यस्थितीत राजकीय वातावरणानुसार केवळ मनसेचे
गटनेते तथा सभागृहनेते अनिल मटाले प्रभाग सभा
शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस ढवळून येत असून, मनसेचे महापाैर अशाेक मुर्तडक, स्थायी सभापती सलीम शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून पक्षाची पडझड राेखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात अाहेत. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून त्याची फारशी दखल घेतली जात नसल्याने अखेरीस ४० नगरसेवकांचा पक्ष अवघ्या चार ते पाच शिलेदारांपुरताच मर्यादित राहताे की काय, अशी शक्यता वर्तविली जाऊ लागली अाहे. मनसेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून अालेल्या सिडकाे, पंचवटी अाणि नाशिकराेड भागात पक्षाचा किल्ला साफ झाला असून, माेजकेच नगरसेवक शिल्लक अाहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत ‘मातोश्री’वर मनसेच्या नगरसेविका शीतल भामरे, सुवर्णा मटाले, नगरसेवक गणेश चव्हाण, तर शेकापचे माजी नगरसेवक जे. टी. शिंदे यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. समवेत मान्यवर.
बातम्या आणखी आहेत...