आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठीच्या मुद्यावर मनसे शहरात पुन्हा करणार ‘खळ‌्ळखट्याक’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- खळ‌्ळखट्याक अांदाेलनांनंतर मध्यंतरीच्या काळात मराठीचा मुद्दाच बाजूला ठेवणाऱ्या मनसेने अाता पुन्हा एकदा अापल्या पुर्वीच्याच रुपात येण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे दिसते. शनिवारी (दि. १८) पुणे अाणि ठाण्यात पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या सभांनंतर मनसे सैनिक पुन्हा एकदा पेटून उठला असून, मराठी पाट्यांच्या मुद्यांकडे लक्ष केंद्रीत करीत इंग्रजी पाट्या लावणाऱ्या व्यावसायिकांना निर्वाणीचा इशारा दिला अाहे. नाशिकमध्ये दुकानांबराेबरच शाळा अाणि महाविद्यालयांच्या पाट्याही मराठीतच असाव्यात असा अाग्रह पदाधिकारी धरतांना दिसत अाहेत. 


मराठीच्या मुद्यावरच मनसेने नाशिकमध्ये अापले बस्तान मांडले हाेते. मराठी भाषिकांना राेजगार मिळवून देण्याचा प्रश्न असाे, परप्रांतीयांचे लाेंढे कमी करण्याचा मुद्दा असाे वा दुकानांवरील मराठी पाट्यांचा प्रश्न असाे प्रत्येक बाबतीत मनसे पक्ष अाघाडीवर हाेता. वेळप्रसंगी शहरात अांदाेलनेही करण्यात येत हाेते. त्याची परिणीती म्हणजे गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत नाशिककरांनी भरभरुन मते देत मनसेच्या हाती महापालिकेची सत्ता साेपविली हाेती. त्यानंतर मात्र मराठीच्या मुद्यांबराेबरच संपूर्ण नाशिक शहराकडेच हवे तितके लक्ष दिले गेल्यामुळे मनसेला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. इतकेच नाही तर गेल्या पंचवार्षिक काळात ४० नगरसेवक निवडून अालेले असताना चालू पंचवार्षिक काळात केवळ पाच नगरसेवकांवर समाधान मानावे लागले अाहे. राज्यभरात मनसेची अशीच स्थिती अाहे. त्यामुळे अाता पुन्हा एकदा जुन्या मुद्यांना घेऊन मनसे रणांगणात उतरत असल्याचे दिसते. गेल्या शनिवारी पुणे अाणि ठाण्यात झालेल्या भाषणात राज यांनी मराठीच्या मुद्याला पुन्हा एकदा अधाेरेखित केले. कर्नाटकमध्ये केवळ तेथील भाषा वापरण्याचा फर्मान मुख्यमंत्र्यांनी काढला अाहे. 


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये तितकी धमक अाहे का असा प्रश्न करीत बँकांमधील व्यवहार मराठीतच व्हावेत तसेच दुकानांवरील पाट्या मराठीतच असाव्यात असा अाग्रह राज यांनी पुन्हा धरल्याचे दिसून येते. मनसेच्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी यासाठी कार्यरत हाेण्याचा सल्ला दिला अाहे. या दृष्टीने फेसबुक अाणि व्हाॅटस अॅपवर पुन्हा एकदा मराठी अस्मितेविषयीच्या संदेशांना उधाण अाले अाहे. यातील काही संदेशांमध्ये अाठ दिवसात मराठी पाट्या लावण्याचे अावाहन दुकानदारांना करण्यात अाले अाहे. तसेच शाळा अाणि महाविद्यालयांनीही अापली नावे मराठीतच लावावीत असे अावाहन मनविसेचे शहराध्यक्ष शाम गाेहाड अाणि जिल्हाध्यक्ष गणेश माेरे यांनी केले अाहे. मराठी राजभाषा अधिनियम १९६४ च्या कलम ( क) नुसार मराठीत पाट्या लावण्याचा अाग्रह धरतांना अाठ दिवसात मराठीत पाट्या लागल्यास पुढील परिणामांना सामोरे जावे असा इशाराही देण्यात अाला अाहे. सध्या साेशल मीडियावर देखील अशा प्रकारच्या पाेस्ट टाकल्या जात अाहेत. 

 

बंॅक व्यवस्थापक, दुकानदारांनी कार्यपध्दती सुधारावी 
बॅंकांमध्ये मराठीत व्यवहार व्हावे तसेच दुकानांवर मराठी भाषेतच पाट्या असाव्यात यासाठी अाम्ही अाग्रही अाहाेत. यासाठी बंॅका अाणि दुकानदारांना अापल्या कार्यपध्दीतीत सुधारणा करण्याचे अाम्ही अावाहन करीत अाहाेत. मराठीचा मुद्दा हाच अामच्या प्राधान्यक्रमात वरच्या स्थानी अाहे. 
-अॅड. राहुल ढिकले, शहराध्यक्ष मनसे 

बातम्या आणखी आहेत...