आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी वस्तूंच्या विक्रीविरोधात मनसेकडून 3 दिवसांचा अल्टिमेटम, अन्‍यथा आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारतावर सातत्याने छुपे हल्ले करणाऱ्या पाकिस्तानच्या वस्तूंची नाशिकमध्ये राजराेसपणे विक्री हाेत असल्याने मनसेने विल्हाेळीनजीकच्या डिकेथलाॅन या क्रीडा वस्तू करणाऱ्या माॅलला तीन दिवसांत या वस्तू हटवा अन्यथा मनसे स्टाइल अांदाेलन करू, असा इशारा दिला आहे.
 
महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर अडचणींचा सामना करणाऱ्या मनसेकडून अाता नानाविध अांदाेलने केली जात अाहेत. मध्यंतरी संजय निरुपम यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून मनसेने अापले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १० नाेव्हेंबर राेजी नाशिकमध्ये येत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये हुरूप वाढला अाहे. या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबई-अाग्रा महामार्गावरील डिकेथलाॅन माॅलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी धडक मारली. या ठिकाणी बास्केटबाॅल, व्हाॅलीबाॅल फुटबाॅल अशा खेळांशी संबंधित पाकिस्तानी उत्पादनाच्या वस्तू विक्री हाेत असल्याचे लक्षात अाले. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी व्यवस्थापनाशी चर्चा करून या वस्तूंची विक्री बंद करण्याची मागणी केली.
 
तीन दिवसांत वस्तूंची विक्री बंद झाल्यास मनसे स्टाइल अांदाेलन केले जाईल, असा इशारा देण्यात अाला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मनाेज घाेडके, विभाग निरीक्षक सचिन भाेसले, अंकुश पवार, नितीन साळवे, विजय ठाकरे, संजय देवरे, नीलेश सहाणे, जितेंद्र जाेशी, निखिल सरपाेतदार, मिलिंद काळे, श्याम गाेहाड, राकेश परदेशी, रवींद्र तांदळे, संजय जाेशी, जीवन तांबट, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित हाेते.
 
पुन्हा पदाधिकारी नगरसेवक लांबच
मनसेच्यादुसऱ्या फळीतील कार्यकर्ते अांदाेलन करत असताना पहिल्या फळीतील पदाधिकारी मात्र यापासून चार हात लांबच असल्याचे दिसून आले. पक्षाचे पाच नगरसेवक असून, त्यांचाही काेणताही संबंध नाही. माजी नगरसेवकांकडूनही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. शहराध्यक्ष तसेच, माजी महापाैर, माजी अामदारही बैठकांपुरतीच हजेरी लावताना दिसत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...