आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजांकडे दुर्लक्ष, नवनिर्माणच लक्ष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘शिवसेनासोडून स्वत:चा पक्ष उभारणा-या राज ठाकरे यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीतील पराभव तसा मोठा धक्का नाही. त्यांनी अनेक धक्के पचवले आहेत. प्रतिकूल परिस्थितीत पक्षाला रामराम करणा-या नाराजांचा विचार करता आता पक्षबांधणीबरोबर नाशिकमधील नवनिर्माणाचेच बोला. असा संदेशात्मक सूर महापौरांसह मनसेच्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत आळवला. त्याबरोबरच राज यांच्या दौ-याच्‍या जोददार शक्तिप्रदर्शनाची तयारीही आली.
‘राजगड’ येथील कार्यालयात महापौर अशोक मुर्तडक, माजी आमदार नितीन भोसले, महानगरप्रमुख तथा स्थायी समिती सभापती राहुल ढिकले, जिल्हा पदाधिकारी डॉ. प्रदीप पवार, सभागृहनेते शशिकांत जाधव, गटनेते अशोक सातभाई, सुजाता डेरे, प्रताप मेहरोलिया यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी भोसले म्हणाले की,आठ वर्षे इतक्या कमी वयात ऐतिहासिक कामगिरी करणारा मनसे हा एकमेव पक्ष आहे. आता पराभव झाला असला तरी, याच पक्षाने अन्यत्र दरवाजे बंद असताना आमदार नगरसेवकपदाची माळ गळ्यात टाकली, हे विसरू नका. देशात, राज्यात काेणत्या लाटेमुळे पराभव झाला, हे सर्वांना माहीत आहे. राज ठाकरे यांनी प्रतिकूल परिस्थितीत पक्षबांधणीचे काम हाती घेतल्यामुळे कोण इकडे गेले, काेण तिकडे, या चर्चेपेक्षा त्यांच्या पाठीशी एकसंघपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
एलबीटी रद्द करण्याचे पोकळ आश्वासन दिल्यामुळे भाजप सरकारचा बुरखा फाटला असून, लोकांना पुन्हा एकदा मनसेविषयी सहानुभूती निर्माण हाेईल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला. पक्षात महिलांना डावलण्याचे प्रकार अाता तरी बंद करा, असा टाेला लगावत निमा जगताप यांनी महिलांना पक्षकार्यात सहभागी करून शिकवण्याचे आवाहन केले.
दहासोडा, दोन तरी काढा... : पदाधिकारीसंपत जाधव यांनी ‘महापालिकेची अार्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे दहा साेडा, िकमान दाेन फायली तरी काढा’, असे आवाहन महापौरांना केले. बैठकीसाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनांमुळे ठक्कर बाजार परिसरात वाहतूक कोंडी झाली हाेती
भोसले-ढिकले पर्व सुरू
मनसेच्यास्थापनेपासून साेबत असलेले बरीच वर्षे शहराध्यक्ष राहिलेले नितीन भोसले हे आमदार असतानाही पक्षसंघटनेत फारसे सक्रिय नव्हते. त्यांना पक्षातील मुख्य प्रवाहापासून अनेक वर्षे दूर ठेवल्याचेही आरोप झाले. मध्यंतरी वसंत गिते यांनी प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता भोसले यांच्याकडे संघटनेची सूत्रे येण्याची चिन्हे आहेत. माजी आमदार उत्तमराव ढिकले यांचे पुत्र राहुल यांनी महानगरप्रमुखपदाच्या माध्यमातून यापूर्वीच शहर संघटनेची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे मनसेत आता भोसले-ढिकले पर्व सुरू झाल्याचे दिसत आहे.
गुरुवारपासूनराज यांचा नाशिक दौरा
महापौरांच्या टिप्स
मुर्तडकयांनी सामान्य व्यक्ती असताना चार वेळा नगरसेवक महापाैर कसे झालो, याकडे लक्ष वेधत, ‘नगरसेवक पदाधिकाऱ्यांना दहा टिप्स दिल्या असून, त्याचे पालन केले तर तुम्ही सहज नगरसेवक व्हाल’, असा दावा केला. नगरसेवक जेथे तो नसेल तेथे पदाधिकाऱ्यांनी मासिक सभा घेऊन समस्या सोडवाव्या. पदाधिकाऱ्यांचे अधिकारी ऐकणार नाहीत, त्यामुळे तेथे मला बाेलवा. तक्रारपेटी वा सूचनापेटी, गरीब मुलांना शाळेत पायाभूत सुविधा, माेफत अध्यापन शिबिरे वा वर्गासारख्या सूचना त्यांनी केल्या.