आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज यांची नववर्षाची सुरुवात नाशिकपासून, अभ्यंकर, सरदेसाईंकडे नाशिकची सूत्रे येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मनसेच्या नाशिक स्थित जुन्या नेत्यांच्या राजीनाम्यानंतर आता राज ठाकरे यांनी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर प्रदेश पदाधिकारी नितीन सरदेसाई यांच्याकडे नाशिकची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
जानेवारीपासून राज हे नाशिकच्या तीनदिवसीय दौ-यावर येत असून, नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून नाशिककडे लक्ष देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
राज यांनी गोदापार्क, शिवाजी उद्यान, पेलिकन पार्क, बॉटनिकल गार्डन यांच्याबरोबरच शहरातील उद्यानांकडे लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी राज यांनी नाशिकमधील चांगल्या उद्यानांची पाहणी करून त्यांना आकर्षक टच कसा देता येईल, यासाठी तज्ज्ञांसमवेत आढावा घेतला. फाळके स्मारक तसेच सायकल डव्हेंचर सेंटरसाठीही त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या सर्व कामांची स्थिती काय कसे बदल करायचे, याचा ते नाशिक दौ-यादरम्‍यान आढावा घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिकची संघटनात्मक पुनर्बांधणीचा विषय महत्त्वाचा असून, त्यासाठी अभ्यंकर सरदेसाई यांच्यापैकी एकाकडे सूत्रे येतील, असेही चित्र आहे. प्रथम 26 डिसेंबर रोजी राज हे नाशिकमध्ये येण्याची शक्यता होती, मात्र त्यात आता बदल करून जानेवारीचा मुहूर्त निश्चित झाल्याचे समजते.