आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns Congress Memebers Shifted In Shivsena Before Election

मनसे-काँग्रेसला तालुक्यात धक्का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंचायत समिती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीने नाशिक तालुक्यात राजकीय समीकरणे बदलली असून, मनसेच्या दोन आणि काँग्रेसच्या एका पंचायत समिती सदस्याने शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत मनसे आणि काँग्रेसला तालुक्यात धक्का बसला आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीने काँग्रेस आघाडीला धोबीपछाड दिल्याने आता विधानसभेतही सत्ता परिवर्तनाच्या शक्यतेने आघाडीसह मनसेलाही उतरती कळा लागली आहे. त्याचा प्रत्यय नुकताच पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीतून आला. काँग्रेस आघाडीकडून उपसभापतिपद मिळत नसल्याने अनिल ढिकले यांनी चक्क मनसेच्या सदस्यांची मोट बांधत रविवारी खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत थेट शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेच्याही एका सदस्याचा त्यांना पाठिंबा मिळाला.
चार सदस्य सोबत असल्याने काँग्रेसचे सदस्य गैरहजर असूनही त्यांना सभापतिपद मिळाले. निवडणूक झाल्यानंतर त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांचीच मातोश्रीवर भेट घेण्यासाठी आपला मोर्चा वळवीत त्यांच्या उपस्थितीत प्रवेशाची इच्छाही व्यक्त केली. दरम्यान, काँग्रेस तालुकाध्यक्षपदावरून आणि पक्षातून अनिल ढिकले यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ढिकले यांची हकालपट्टी
पदाची एवढी हौस होती तर ढिकले यांनी कॉंग्रेसचा राजीनामा देऊन अपक्ष किंवा विरोधी पक्षातून निवडून यावयास हवे होते. त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांची तत्काळ कॉंग्रेस तालुकाध्यक्षपदासह इतर सर्वच पदांवरून हकालपट्टी केली आहे. पक्षांतर बंदी कायद्यान्वये त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

कारवाई करू
पंचायत समितीच्या सदस्या शोभा लोहकरे आणि सुशीला वाघले यांनी पक्षविरोधी काम केले आहे. त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार लागलीच कारवाई केली जाईल. याबाबत सोमवारीच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत त्यांचे सदस्यत्वही रद्द करण्यासाठी प्रक्रिया हाती घेतली जाईल.
रमेश खांडबहाले, तालुकाध्यक्ष, मनसे