आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांच्या राजीनाम्याची मनसेची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुष्काळात उपोषणकर्त्यांची अश्लील भाषेत खिल्ली उडवल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

पवारांच्या धिक्काराच्या घोषणा देत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही मनसेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली. आमदार वसंत गिते यांच्या नेतृत्वाखाली राजगड कार्यालयावरून मोर्चा काढला. या वेळी महापौर यतिन वाघ, अतुल चांडक, सचिन ठाकरे, अशोक मुर्तडक, सुजाता डेरे आदींसह नगरसेवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अजित पवारांच्या धिक्कारांच्या जोरदार घोषणा सुरू होत्या. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, अजित पवारांच्या वक्तव्यामुळे शेतकरीच नाही तर नागरिकांचाही अपमान झाला आहे. महाराष्ट्रात बिकट परिस्थिती असून, भारनियमन व दुष्काळाला कॉँग्रेस आघाडीचेच सरकार जबाबदार आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळणारी वक्तव्ये करणार्‍या अजित पवार यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.


तर आंदोलन
अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे दुष्काळग्रस्तांबरोबरच सर्वसामान्यांच्या मनात भयंकर संताप आहे. त्यामुळे पवार यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा दिला नाही तर मनसे रस्त्यावर उतरेल. वसंत गिते, आमदार, मनसे