आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकात कांदा स्वत,मनसेतर्फे वाटप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरानगर - महागाईच्या झळा सोसणार्‍या गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा, दहा रुपये किलोने उपलब्ध झाल्याने महिलांनी समाधान व्यक्त करीत मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला.

इंदिरानगर मनसेतर्फे वर्धापनदिनानिमित्त प्रभाग क्रमांक 40 मधील नागरिकांना नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी व यशवंत निकुळे यांनी दहा रुपये किलोने कांदा उपलब्ध करून दिला. बाजारात 18 ते 20 रुपये दराने मिळणारा कांदा खरेदी करणे सर्वसामान्य कुटुंबांसाठी अवघड झाले आहे. कांद्याच्या दरावर महागाईचा झालेला परिणाम लक्षात घेऊन महिलांना स्वस्त दरातील कांदा उपलब्ध करून दिला.

या विक्रीचा शुभारंभ मनसेचे अभिजित बगदे, संतोष कोतवाल, पद्मिनी वारे, सचिन कुलकर्णी, रामदास गिते, बापू गोरे, तुकाराम घोडेकर, पवन कंठे, मंजुषा पुजारी, सरिता पटेल, कल्पना अक्कर आदींच्या उपस्थितीत पार पडला. महिलांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती.

दोन हजार किलो कांदा उपलब्ध
पिंपळगाव बसवंत येथील एका व्यापार्‍याकडून एक ट्रक कांदा विक्रीसाठी उपलब्ध केला. दहा रुपये किलोने प्रत्येकी पाच किलो या प्रमाणात कांद्याची विक्री करण्यात आली. बाजारभावाच्या तुलनेत 10 रुपये स्वस्त दरात कांदा उपलब्ध केल्याने महिलांनी उत्स्फूर्तपणे खरेदी करण्याचा आनंद लुटला.