आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचे मतदार नोंदणी अभियान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीबरोबरच आधार कार्ड नोंदणी अभियानाचे नियोजन शनिवारी मनसेच्या बैठकीत करण्यात आले. राज ठाकरे यांचा 14 जून रोजी येणारा वाढदिवस साजरा करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले.
मनसेचे सरचिटणीस, आमदार वसंत गिते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सरचिटणीस अतुल चांडक, आमदार अँड. उत्तमराव ढिकले, आमदार नितीन भोसले, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, महापौर अँड. यतिन वाघ यांच्यासह नगरसेवक, विभाग-तालुकाप्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यात तसेच नाशिक शहरात विभागनिहाय मतदार नोंदणीचे बूथ लावण्यात येणार असल्याची माहिती आमदार गिते यांनी दिली.
मनसेवर टीका करणार्‍या विरोधकांना जिथल्या तिथे उत्तर देऊन विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोचविण्याचे आवाहन करण्यात आले. शहर कार्यकारिणी बदलाचेही या वेळी संकेत देण्यात आले. कार्यकारिणी राज यांच्या नाशिक दौर्‍याच्या वेळी जाहीर केली जाणार आहे. 18, 19, 20 जूनला ठाकरे नाशिकला येणार आहेत.
नाही भेटणार राज
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन आणि दुष्काळ यामुळे राज ठाकरे वाढदिवस साजरा करणार नसल्याने शुभेच्छाफलक, जाहिरात तसेच कोणत्याही स्वरूपाचे कार्यक्रम हाती घेऊ नयेत, अशी सक्त सूचना करण्यात आली. तसेच, वाढदिवशी राज कार्यकर्त्यांना भेटणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.