आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या जम्बो कार्यकारिणीचा आवाज घुमणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जनतेपर्यंत पोहोचण्यात पक्षाला येणारे अपयश लक्षात घेऊन मनसे शहर कार्यकारिणीने दोन प्रवक्त्यांची निवड केली. याबरोबरच निवडणुकीच्या तोंडावर 75 जणांची जम्बो कार्यकारिणीही जाहीर केली.
राजगड येथील कार्यालयात आमदार वसंत गिते, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी सोमवारी कार्यकारिणीची घोषणा केली. यात सहा विभाग अध्यक्ष, सहा उपाध्यक्ष, 16 शहर सरचिटणीस, 18 शहर संघटक, दोन प्रवक्ते, राजगड कार्यालयप्रमुख, 17 शहर चिटणीस, 14 शहर कार्यकारिणी सदस्य यांचा समावेश आहे.

तीन विधानसभा निरीक्षक : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरातील विधानसभा मतदारसंघांतील ताकद वाढवण्यासाठी तीन निरीक्षकांची निवड करण्यात आली आहे. यात विभाग अध्यक्ष असलेल्या अनिल वाघ यांना बढती देत नाशिक-पूर्व मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून, तर अनिल भालेराव यांना मध्य व सुरेश भंदुरे यांना पश्चिम विधानसभा मतदारसंघ निरीक्षक केले गेले.

दोन प्रवक्त्यांबरोबर ‘राजगड’प्रमुखही : मनसेची भूमिका मांडण्यासाठी अँड. अभिजित बगदे व पराग शिंत्रे यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे. याबरोबरच प्रदीप वझरे यांच्याकडे ‘राजगड’ कार्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

अशी आहे शहर कार्यकारिणी..
विभाग अध्यक्ष : संजय दंडगव्हाळ व मुजाहिद सलीम अब्बास (मध्य), संतोष सहाणे व अनंता सूर्यवंशी (पश्चिम), मोहन मोरे व गोकुळ खैरनार (पश्चिम).

उपाध्यक्ष : मिलिंद भालेराव, बाळू काकड, रवींद्र काळे, सुभाष शेजवळ, संतोष क्षीरसागर, संदीप बोरसे
सरचिटणीस : अरुण पाटील, डॉ. भालचंद्र ठाकरे, विनोद गाडे, रवींद्र जाधव, प्रमोद साखरे, माणिक मेमाणे, विश्वास हावळे, अरुण ढिकले, गोरख आहेर, संतोष गायकवाड, किशोर जाचक, गौतम चोरडिया, विलास पोरजे, तुकाराम कोंबडे, निखिल सरपोतदार, जगदीश पाटील.

संघटक : शेख असिफअली गुलामगौस, सोमनाथ गुंबाडे, शब्बीर काचवाला, संतोष कोतवाल, कृष्णकुमार नेरकर, भाऊसाहेब निमसे, निवृत्ती इंगोले, शेख गफ्फार शेख मेहबूब, रमेश साळुंके, हरिश्चंद्र विधाते, सुनील धाडगे आदी.